कामचुकार ग्रामसेवकांची कानउघाडणी
By admin | Published: May 9, 2017 02:10 AM2017-05-09T02:10:42+5:302017-05-09T02:10:42+5:30
स्वच्छता अभियानात हयगय करणे भोवले!
वाशिम : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हगणदरीमुक्त गाव मोहीम व शौचालय बांधकामप्रकरणी हयगय करणार्या ग्रामसेवकांची मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी सोमवारी चांगलीच कानउघाडणी केली.
जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी ग्रामपंचायतनिहाय आढावा घेतला. गतवर्षी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत (ग्रामीण) काही ग्रामसेवकांनी ढिसाळ कामगिरी केल्याने संबंधित गाव हगणदरीमुक्त होऊ शकले नाही. तसेच शौचालय बांधकामाचे इच्छित उद्दिष्टही पूर्ण झाले नाही. अशा कामचुकार व कर्तव्यात दिरंगाई करणार्या ग्रामसेवकांना पाटील यांनी चांगलेच खडसावले. तसेच कामकाजात सुधारणा करण्याची सक्त ताकिद दिली. नोकरी टिकवायची असेल, तर शौचालयाच्या कामांना गती द्या, असा इशारा दिला. गतवर्षी शौचालय बांधकाम प्रकरणात दिरंगाई करणार्या ग्रामसेवकांचा ह्यविशेषह्ण आढावा घेण्यात आला. सन २0१७-१८ या वर्षात हगणदरीमुक्त गाव मोहीम दिरंगाई केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पाटील यांनी दिला.