घुमडे पर्यटन नकाशावर आणणार

By admin | Published: May 17, 2016 10:41 PM2016-05-17T22:41:56+5:302016-05-18T00:18:31+5:30

दत्ता सामंत : काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवडीनंतर ग्रामस्थांच्यावतीने सत्कार

Horse tourism will bring on the map | घुमडे पर्यटन नकाशावर आणणार

घुमडे पर्यटन नकाशावर आणणार

Next

मालवण : घुमडे गावात सर्वपक्षीय पदाधिकारी असले तरी गावात टिकून असलेला ग्रामस्थांचा एकोपा हा गावाच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. घुमडे गावाकडे आज कृषी पर्यटन म्हणून पर्यटकांची पसंती आहे. त्यामुळे येत्या काळात तारकर्ली-देवबागप्रमाणे घुमडे गावाचा विकास करून पर्यटन नकाशावर घुमडे येण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही
काँग्रेसच जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी दिली.
घुमडे ग्रामस्थांच्यावतीने दत्ता सामंत यांचा डॉ. प्रवीण बिरमोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उद्योजक बाबू बिरमोळे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष मनमोहन राणे, सरपंच ऊर्मिला वस्त, उपसरपंच विष्णू बिरमोळे, आबा बिरमोळे, प्रदीप बिरमोळे, दिलीप बिरमोळे, अनंत राऊत, राजू परुळेकर, सुधीर वस्त, प्रशांत बिरमोळे, उमेश बिरमोळे, प्रा. दीपक बिरमोळे, बाळा माने, भाऊ सामंत, कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे, आदी उपस्थित होते.
यावेळी अशोक सावंत, दीपक बिरमोळे, अनंत राऊत, बाबू बिरमोळे, गजानन बाक्रे यांनी विचार मांडले. (प्रतिनिधी)

नारायण राणे यांचा विश्वास सार्थकी लावणार
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. राणे यांनी दिलेला हा विश्वास सार्थकी लावणार आहे. काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील आजी-माजी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पक्षाला वैभव मिळवून देणार आहे.
जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी असल्याने पदाचा गावाच्या विकासासाठी वापर केला जाईल. सत्तेत असू किंवा नसू, मात्र नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली घुमडे गाव पर्यटनात अग्रेसर करेन, असा विश्वास व्यक्त करताना वाडीवार रस्ते पोहोचविण्याची ग्वाही सामंत यांनी दिली.

Web Title: Horse tourism will bring on the map

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.