कुडाळात हॉटेल व्यावसायिक एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 01:45 PM2020-02-11T13:45:10+5:302020-02-11T13:46:33+5:30
कुडाळ तालुका हॉटेल, लॉजिंग चालक-मालक संघटनेची बैठक कुडाळ मारुती मंदिर धर्मशाळा येथे झाली. यावेळी या संघटनेचे अध्यक्ष राजन सुरेश नाईक, उपाध्यक्ष रत्नाकर प्रभू, सचिव लक्षीकांत मालवणकर, सल्लागार प्रकाश कुंटे, भाऊ शिरसाट,महेश भाट यांच्यासह जवळपास दोनशेहून अधिक हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.
कुडाळ : कुडाळ तालुका हॉटेल, लॉजिंग चालक-मालक संघटनेची बैठक कुडाळ मारुती मंदिर धर्मशाळा येथे झाली. यावेळी या संघटनेचे अध्यक्ष राजन सुरेश नाईक, उपाध्यक्ष रत्नाकर प्रभू, सचिव लक्षीकांत मालवणकर, सल्लागार प्रकाश कुंटे, भाऊ शिरसाट,महेश भाट यांच्यासह जवळपास दोनशेहून अधिक हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.
यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी संघटित राहून या व्यवसायाशी निगडित असलेल्या समस्यांवर एकत्रितपणे लढा द्यायचे असे प्रकाश कुंटे यांनी सुचविल्याप्रमाणे सर्वानुमते ठरले.
ज्याप्रमाणे मेडिकल स्टोअर्स तत्काळ सेवेमध्ये गृहीत धरून सार्वजनिक बंदमधून वगळण्यात येतात त्याचप्रमाणे कुडाळ शहरात येणाऱ्या बाहेरगावातील नागरिकांना, आजारी व्यक्तींना होणारा त्रास लक्षात घेऊन हॉटेल व्यवसायही सार्वजनिक बंदमधून वगळण्यात यावेत अशी मागणी करण्याचे ठरले.
अनेक हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या विचारात घेऊन येत्या एक महिन्यात पुन्हा बैठक घेऊन त्यावर योग्य तोडगा काढायचे यावेळी ठरविण्यात आले.