कणकवलीत किती प्रकल्प सुरू आहेत? : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 03:34 PM2019-12-28T15:34:27+5:302019-12-28T15:36:24+5:30

कणकवलीत जे प्रकल्प आणले त्यातील किती प्रकल्प सुरू आहेत याचा आमदार नीतेश राणे यांनी अभ्यास करावा आणि नंतर सावंतवाडीतील बंद प्रकल्पांचा शोध घ्यावा. तसेच निवडणुकीसाठी पैसे पुरविणाऱ्यांच्या बॅगा उचलणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये, असा सल्ला भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे नाव न घेता आमदार दीपक केसरकर यांना केला ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

 How many projects are underway in Karnavali? : Deepak Kesarkar | कणकवलीत किती प्रकल्प सुरू आहेत? : दीपक केसरकर

सावंतवाडी येथे महाविकास आघाडीची संयुक्त बैठक झाली. यावेळी दीपक केसरकर, वैभव नाईक, प्रवीण भोसले, विकास सावंत, अमित सामंत, संंजय पडते, बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्दे कणकवलीत किती प्रकल्प सुरू आहेत? : दीपक केसरकरनीतेश राणे यांना केला सवाल; बॅगा उचलणाऱ्यांनी टीका करु नये

सावंतवाडी : कणकवलीत जे प्रकल्प आणले त्यातील किती प्रकल्प सुरू आहेत याचा आमदार नीतेश राणे यांनी अभ्यास करावा आणि नंतर सावंतवाडीतील बंद प्रकल्पांचा शोध घ्यावा. तसेच निवडणुकीसाठी पैसे पुरविणाऱ्यांच्या बॅगा उचलणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये, असा सल्ला भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे नाव न घेता आमदार दीपक केसरकर यांना केला ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, बाबू कुडतरकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उदय भोसले, अण्णा केसरकर, हर्षवर्धन धारणकर, सावळाराम अणावकर, पुंडलिक दळवी आदी उपस्थित होते.

आमदार केसरकर म्हणाले, ज्या नाट्यगृहाबाबत राणे बोलतात त्या नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी एक कोटीहून अधिक निधी मंजूर आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे. हे नाट्यगृह अद्ययावत आहे. पण त्याला आता २५ वर्षे झाली असून, त्याचे नव्याने नूतनीकरण करण्यात येईल. शिल्पग्रामचा पूर्ण कायापालट झाला आहे.

जगन्नाथराव उद्यानात आज असंख्य मुले येतात. चोवीस तास पाण्यासाठी ४५ कोटी रुपयांची योजना प्रस्तावित योजना तयार आहे. २२ कोटी रुपयांची भूमिगत वीजवाहिनी मंजूर आहे. हेल्थफार्मचेही खासगीकरण होणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले. सावंतवाडी माझ्या हृदयात आहे. त्यामुळे टिकेला उत्तर देणार नाही. येथील जनता सर्व काही जाणून आहे.

ते पुढे म्हणाले, ज्या प्रमोद जठारांनी कुठल्याही नगरपालिकेमध्ये काम केले नाही, जे ३४ मतांनी निवडून आले, त्यांनी व राणेंनी माझ्या विरोधात निवडणुकीत एकत्र येऊनही तसेच गोव्यातील मंत्री बोलावूनही सावंतवाडीकरांना ते विकत घेऊ शकले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीतही आमच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे.

केसरकर म्हणाले, माझ्या काळात एक तरी मायनिंग प्रकल्प येथे सुरू झाला का? याची माहिती अतुल काळसेकर यांनी घ्यावी. राजकीय व्यक्तींचे मित्र अनेक असतात, पण पैशांच्या नजरेतून सगळीकडे बघू नये. जी व्यक्ती मुंबईतून पैसे घेऊन येणाऱ्या व्यक्तीच्या बॅगा उचलते, त्याच्याबद्दल मी काय बोलणार? असेही केसरकर यांनी सांगितले.

नगराध्यक्षपदासाठी आज जे उमेदवार आहेत, त्यांची गाडी जाळल्यानंतर मी त्यांना भेटलो. त्यावेळी त्यांनी मला जे काय सांगितले, ते आज मी बोलणार नाही. मात्र, त्यांचा तो आपापसातील मामला आहे, असा गौप्यस्फोटही केसरकर यांनी केला.

महाविकास आघाडीच अधिकृत : सावंत

विकास सावंत म्हणाले, आज जरी काँग्रेसचे चिन्ह मतदान यंत्रात असले तरी अधिकृत उमेदवार बाबू कुडतरकर हेच असल्याचे सांगण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आज माझ्या मुलासाठी मी स्वार्थ साधत असल्याचा आरोप काहीजण करत आहेत. पण माझा मुलगा स्वत:चे करिअर घडविण्यासाठी सक्षम आहे. अमित सामंत यांनी याठिकाणी काँग्रेसला मत म्हणजे भाजपाला मत आहे. त्यामुळे जनतेने विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन केले.

 

Web Title:  How many projects are underway in Karnavali? : Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.