देवगड बंदरात शेकडो नौका दाखल, अरबी समुद्रात वादळसदृश परिस्थिती 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 29, 2023 07:19 PM2023-09-29T19:19:07+5:302023-09-29T19:19:40+5:30

हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Hundreds of boats enter Devgad port, stormy conditions in Arabian sea | देवगड बंदरात शेकडो नौका दाखल, अरबी समुद्रात वादळसदृश परिस्थिती 

देवगड बंदरात शेकडो नौका दाखल, अरबी समुद्रात वादळसदृश परिस्थिती 

googlenewsNext

देवगड : अतिवृष्टी व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून देवगड बंदरात शेकडो मच्छीमार नौका दाखल झाले आहेत. यामध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गुजरात राज्यातील नौकांचा समावेश आहे.

२९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे देवगड बंदरामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात व स्थानिक नौका सुरक्षिततेसाठी दाखल झाले आहेत.

देवगड बंदर हे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे बंदर असून अनेक वेळा मोठमोठी वादळ झाली त्यावेळी देवगड बंदरामध्येच अनेक राज्यातील नौकांनी आश्रय घेतला होता. हवामान खात्याचा आदेश आल्यानंतर प्रत्येक वेळी देवगड बंदरामध्ये सुरक्षितेसाठी आजही नौका दाखल होत आहेत.

Web Title: Hundreds of boats enter Devgad port, stormy conditions in Arabian sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.