आठवडाभरात सव्वा कोटी वसूल
By admin | Published: November 17, 2016 10:11 PM2016-11-17T22:11:02+5:302016-11-17T22:11:02+5:30
नोटा बंदचा परिणाम : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये घरपट्टीसह पाणीपट्टीची विक्रमी वसुली
रत्नागिरी : ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सहा दिवसांमध्ये १ कोटी ५ लाख ६ हजार १०४ रुपये घरपट्टी आणि १८ लाख ६५ हजार ८३२ रुपये पाणीपट्टीची विक्रमी वसुली केली.
केंद्र शासनाने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सर्वांचीच धावपळ उडाली होती. शासनाच्या या निर्णयाने ग्रामपंचायती व इतर विभागानेही या नोटा घेण्यास नकार दिला होता. मात्र, ८ नोव्हेंबर रोजी शासनाने ग्रामपंचायतींना ५०० व १००० रुपयांच्या नोटा घेण्याचे आदेश दिल्यानंतर पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यासाठी धावपळ उडाली होती.
घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहीम फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये जोरदारपणे राबविली जाते. त्यामुळे या दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वसुली होते. यावेळी शासनाने नोटा बंदी केल्याने या जुन्या नोटा खर्च कुठे करायच्या, असा प्रश्न अनेकांना सतावत होता. मात्र, शासनाने ग्रामपंचायतींना जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिल्यानंतर ग्रामपंचायतींमध्ये घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी एकच गर्दी झाली होती.
९ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीमध्ये ग्रामपंचायतींमध्ये घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी नोटा बंदीच्या दिवसांमध्ये घरपट्टी व पाणीपट्टीची मिळून एकूण १ कोटी २३ लाख ७१ हजार ९३६ रुपये वसुली केली.
शासनाच्या नोटाबंदीच्या आदेशानंतर अनेकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याने ग्रामपंचायतींच्या महसुलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी जास्तीत जास्त प्रमाणात वसूल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)
ग्रामपंचायत करवसुली (घरपट्टी)
तालुकादि. ९ ते ११ नोव्हेंबरमध्येदि. १२ ते १४ नोव्हेंबरमध्ये
वसूल झालेली रक्कमवसूल झालेली रक्कम
मंडणगड२,५५,७८५२,६२,०७१
दापोली२५,२००१,१०,०००
खेड२,०३,१६५२,१८,५०७
चिपळूण५,५५,५००२,९५,५००
गुहागर२,०६,२३२१,६१,४२६
संगमेश्वर३,४०,२२५११,७९,०४१
रत्नागिरी१८,८०,८६०४४,६८,०५२
लांजा८६,२४०४०,३००
राजापूर१,५०,०००६८,०००
ग्रामपंचायत करवसुली (पाणीपट्टी)
तालुकादि. ९ ते ११ नोव्हेंबरमध्येदि. १२ ते १४ नोव्हेंबरमध्ये
वसूल झालेली रक्कमवसूल झालेली रक्कम
मंडणगड१,१५,८७०१,२७,४३५
दापोली४८,०००७९,२००
खेड९७,७४८८८,०००
चिपळूण३,२५,०००५०,४५०
गुहागर६,४६००
संगमेश्वर१,१५,२०११,४१,८०९
रत्नागिरी४,७०,९००१,०३,९९९
लांजा२५,४००२४,१६०
राजापूर३१,२००१५,०००