समुद्रात चक्रीवादळाचा इशारा -होणार पर्जन्यवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 03:50 PM2020-06-01T15:50:07+5:302020-06-01T15:52:14+5:30
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध झालेल्या सूचनेनुसार दक्षिणपूर्व व पूर्वमध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असून याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ४ जून २०२० या कालावधीत गडगडाटासह मुसळधार पर्जन्यवृष्टी होणार आहे.
सिंधुदुर्गनगरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध झालेल्या सूचनांनुसार दक्षिणपूर्व व पूर्वमध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असून याचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ४ जून २०२० या कालावधीत गडगडाटासह मुसळधार पर्जन्यवृष्टी होणार आहे. तसेच १ जून रोजी जिल्ह्यात सोसाट्याचे वारे वाहणार आहेत. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर सायंकाळी गडगडाटासह जिल्ह्यात पावसाने आपली हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागात जोराचा पाऊस कोसळला तर काही भागात कमी प्रमाणात पाऊस झाला.
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध झालेल्या सूचनेनुसार दक्षिणपूर्व व पूर्वमध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असून याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ४ जून २०२० या कालावधीत गडगडाटासह मुसळधार पर्जन्यवृष्टी होणार आहे.
तसेच १ जून २०२० रोजी जिल्ह्यात सोसाट्याचे वारे वाहणार आहेत. १ ते ४ जून या कालावधीत जिल्ह्यात समुद्र खवळलेला राहणार आहे.
तसेच समुद्रात सोसाट्याचे वारे वाहणार असल्याने या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच जे मच्छिमार समुद्रात गेलेले आहेत त्यांना किनाºयावर परत येण्याच्या सूचना भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर आपण आपल्या अखत्यारित येणाºया सर्व यंत्रणांना याबाबत सावधानता बाळगण्याच्या सूचना द्याव्यात. विशेषत: किनारी भागातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात याव्यात.
आपल्याकडील शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. शोध व बचावगट कार्यरत ठेवावेत. तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाच्या सातत्याने संपर्कात राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाला त्याची त्वरित माहिती द्यावी.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विभाग प्रमुखांनी पुढील सूचना मिळेपर्यंत आपले मुख्यालय सोडू नये, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी साठे यांनी केल्या आहेत.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला राहणार असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी परत यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.
या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ४ जून २०२० रोजीपर्यंत गडगडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच जिल्ह्यात सोसाट्याचे वारे वाहणार आहेत. समुद्र खवळलेला राहणार आहे.
वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सावधानता बाळगावी. विशेषत: किनारी भागातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी सतर्क रहावे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी.
शोध व बचावगट कार्यरत ठेवावेत. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास नियंत्रण कक्षाला तत्काळ माहिती द्यावी, विभाग प्रमुखांनी पुढील सूचना मिळेपर्यंत मुख्यालय सोडू नये, अशा सूचनाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केल्या आहेत.