पत्नीला वाचविताना पतीचा मृत्यू

By Admin | Published: August 31, 2014 12:29 AM2014-08-31T00:29:06+5:302014-08-31T00:29:32+5:30

पत्नी बचावली : केळूस-खुंडासवाडीतील घटना

Husband dies while saves his wife | पत्नीला वाचविताना पतीचा मृत्यू

पत्नीला वाचविताना पतीचा मृत्यू

googlenewsNext

कुडाळ : विजेचा शॉक लागलेल्या पत्नीला वाचविताना केळूस-खुंडासवाडी येथील विजय खरात (वय २३) या युवकाचा मृत्यू झाला. या घटनेत त्याची पत्नी मात्र बचावली. ही घटना शुक्रवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
केळूस येथील विजय खरात यांच्याकडे गणपती आणण्यात आला होता. मोठ्या उत्साहात खरात कुटुंंबियांनी गणपतीचे पूजन केले. घरात आनंदाचे वातावरण होते. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास खरात याची पत्नी अंगणात वाळत टाकलेले कपडे आणण्यासाठी गेली होती. मात्र, कपडे वाळत घातलेल्या तारेला अंगणात सोडलेल्या बल्बची वायर कट होऊन स्पर्श करीत असल्याने ती विद्युतभारीत झाली होती. अनावधानाने या विद्युत भारीत तारेला तिचा स्पर्श होताच शॉक बसून ती वायरला चिकटून राहिली. आपल्या पत्नीला विजेचा शॉक बसल्याचे विजयच्या लक्षात येताच त्याने तत्काळ धाव घेऊन तिला तारेपासून दूर ढकलले. मात्र, या प्रयत्नात त्याचा स्पर्श तारेला होऊन त्याला विजेचा जबरदस्त धक्का बसला आणि तारेसहीत तो खाली कोसळला.
वैद्यकीय सेवाच मिळाली नाही
शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या विजयला तत्काळ उपचारांसाठी म्हापण येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टर नसल्याने परूळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथेही डॉक्टर नसल्याने विजयला कु डाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल हलविण्यात आले. मात्र, कुडाळमध्ये आणण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. विजयने घराच्या बाहेरील अंगणात लोखंडी मंडप घातला असून तिथे कपडे वाळत घालण्यासाठी तारा लावण्यात आल्या आहेत. याच तारेला लागून अंगणात असलेल्या लाईटची वायर तारेकडे कट होऊन तारही विद्युत भारीत झाली होती.
विजय म्हापण बाजारपेठेत उसाचा गाडा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असे. त्याच्या मृत्यूने घरातील एकमेव कमावती व्यक्ती गेल्याने खरात कुटुंबियांचा आधारवडच हरपला आहे. विजयच्या पश्चात पत्नी, आईवडील व एक महिन्याची छोटी मुलगी तसेच दोन विवाहीत बहिणी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Husband dies while saves his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.