विवाहितेवर अतिप्रसंग; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 11:20 PM2017-09-26T23:20:36+5:302017-09-26T23:20:36+5:30

Hype over marriage; Both arrested | विवाहितेवर अतिप्रसंग; दोघांना अटक

विवाहितेवर अतिप्रसंग; दोघांना अटक

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
बांदा : नवºयाला व तुला ठार मारू अशी धमकी देत विवाहित महिलेवर तिघा युवकांनी वारंवार अतिप्रसंग केल्याची घटना शेर्ले (ता. सावंतवाडी) येथे घडली. याबाबत त्या पीडित महिलेने बांदा पोलिसांत मंगळवारी तक्रार दिली. या प्रकरणातील संशयित तीन युवकांपैकी निखिल ऊर्फ मोहन शंकर आरोसकर (वय २२) व साईनाथ बाबा धुरी (३२, दोघेही रा. शेटकरवाडी) या दोघांना बांदा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा अटक केली. तर तिसरा संशयित गौरेश केरकर याचा शोध सुरू आहे.
याबाबत बांदा पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी दिलेली माहिती अशी की, शेर्ले-दुकानवाडीतील या पीडित महिलेचा विवाह ११ मार्च २०१६ रोजी झाला होता. यानंतर तिच्या नवºयाचा मित्र असलेला निखिल हा जानेवारी महिन्यात पीडित महिलेच्या घरी पाणी मागण्यासाठी आला होता. ती महिला पाणी आणण्यासाठी स्वयंपाकगृहात गेली असता निखिल याने तिच्या मोबाईलवरून तिचा नंबर घेतला. त्यावरून त्याने तुला व तुझ्या नवºयाला ठार मारू अशी धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यामुळे त्या विवाहितेने ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली नाही. दरम्यान, निखिल याने याबाबत आपले मित्र साईनाथ व गौरेश यांना सांगत त्या महिलेचा मोबाईल क्रमांक दिला. त्यांनीही तिच्या घरी जात तुझ्यात आणि निखिल यांच्यातील संबंधाची माहिती तुझ्या नवºयाला सांगू अशी धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला.
काही दिवसांपूर्वी ती विवाहिता आपल्या माहेरी गेली असता यातील निखिल याने तिला मोबाईलवरून धमकी देत बोलावून घेत पुन्हा अतिप्रसंग केला. मात्र आपल्या पतीला व आपल्या जिवाला धोका होईल या भीतीने तिने ही गोष्ट सांगितली नाही. हा प्रकार जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत घडला. वारंवार होणाºया या त्रासामुळे ती विवाहिता मानसिक दबावाखाली वावरत होती. अखेर मानसिक त्रासाला कंटाळून तिने मंगळवारी या तिघांविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दिली.
बांदा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेली ही महिला प्रचंड दबावाखाली असल्याचे दिसून येत होते. बांदा महिला पोलिसांनी तिला धीर देत तिची तक्रार घेतली व या प्रकरणातील तिघांपैकी दोघांना तत्काळ अटक केली. तर यातील तिसरा संशयित गौरेश हा कामाला बाहेर गेल्याने पोलिसांना आढळून आला नाही. या पीडित महिलेचा पती हा बांद्यात एका वाहनावर खासगी चालक म्हणून कामाला आहे. तर हे तिघे संशयित या महिलेच्या पतीचे मित्र असल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: Hype over marriage; Both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.