मी तर गोरगरिबांचा कॅप्टन : केसरकर

By admin | Published: July 17, 2017 12:01 AM2017-07-17T00:01:17+5:302017-07-17T00:01:17+5:30

मी तर गोरगरिबांचा कॅप्टन : केसरकर

I am the Captain of Gorargibhin: Kesarkar | मी तर गोरगरिबांचा कॅप्टन : केसरकर

मी तर गोरगरिबांचा कॅप्टन : केसरकर

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सावंतवाडी : मी अवैध मच्छिमारांचा कॅप्टन नसून, गोरगरीब जनतेचा कॅप्टन आहे. त्यामुळे माझ्यावर नाहक टीका करण्यापेक्षा आम्ही केलेल्या विकासकामांना वडीलधाऱ्यांच्या भूमिकेतून आशीर्वाद द्या, असा टोला राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात २७०० कोटींचा निधी आणल्याचा दावा केला.
मंत्री केसरकर पुढे म्हणाले, सिंधुदुर्गचा विकास हा झपाट्याने होत आहे. मी विकासाचे अनेक प्रकल्प घेऊन येत आहे. या कामाची लवकरच निविदा प्रकियाही होणार आहे; पण सर्व काही मी केले असे म्हणत नाही. मी व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार चांदा ते बांदा योजना राज्यात राबवीत आहोत. या योजनेत चंद्रपूर व सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे या योजनेचे श्रेय मला घेण्याची गरज नाही, असे सांगत जिल्ह्याचा विकास सर्वांना विश्वासात घेऊनच केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी माझ्यावर पहिली बालवाडी उभारा अशी टीका केली होती; पण माझ्या काळात जिल्हा परिषदेला ७० ते ८० कोटींचा निधी दिला आहे. हे सर्व पैसे पडून आहेत. त्याचा राणे यांनी अभ्यास करावा. त्यात किती बालवाड्या होतील हे बघावे, असे सांगितले. आतापर्यंत आपण मोठमोठी महाविद्यालये उभारली आणि इतरांना बालवाडीची स्वप्ने दाखविता. तुमची महाविद्यालये ही खासगी आहेत. तेथे सर्वसामान्य माणसांना प्रवेश घेताना लाखो रुपये मोजावे लागतात. त्यामुळेच मी शासकीय महाविद्यालय जिल्ह्यात यावे अशी मागणी केली होती, असेही त्यांनी सांगितले. राणे यांनी अजून दहा खासगी महाविद्यालये उभारली तरी मी त्यांचे स्वागतच करेन, असे सांगत जिल्ह्यातील पहिले स्पर्धा परीक्षा सेंटर लवकरच सावंतवाडी येथे सुरू होणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी जाहीर केले.
आमदार नीतेश राणे यांनी मला अवैध मच्छिमारांचा कॅप्टन असे म्हटले आहे; पण मी अवैध मच्छिमारांचा कॅप्टन नाही, तर गोरगरीब जनतेचा कॅप्टन आहे. ज्यांनी मच्छिमारांसाठी आतापर्यंत काहीच केले नाही, ते वाद उभा करीत आहेत. पण त्यांनी वाद उभा करताना मला यात नाहक ओढू नये. माझी भूमिका ही नेहमी परराज्यांतील मच्छिमारांच्या विरोधातील आहे. कर्नाटक व गोवा येथील ट्रॉलर्स आपल्या समुद्रात येऊन मच्छिमारी करतात. याविरोधात गस्ती नौका, अतिरिक्त पोलीस बळ हे मी स्वत: उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परराज्यांतील येणारे ट्रॉलर्स बंद झाले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मच्छिमारांना डिझेल तसेच भविष्यात जिल्ह्यातील ८०० बोटींना इंजिन देण्यात येणार आहे. मच्छिमारांचे प्रश्न आम्ही सोडविले. एवढी वर्षे राणे यांनी हे प्रश्न का सोडविले नाहीत? त्यांना सर्वसामान्यांविषयी आस्था नाही. ते फक्त राजकारण करतात, असा टोलाही त्यांनी यावेळी राणे यांना लगावला.
पुढील महिन्यापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आम्ही आणलेल्या निधीतून विकासकामांची उद्घाटने होणार असून, या विकासकामांना वडीलधाऱ्यांच्या भूमिकेतून नारायण राणे यांनी आशीर्वाद द्यावेत. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत २७०० कोटींचा निधी आणण्यात आला असून, काही विकासकामे निविदेच्या प्रकियेत आहेत. तर काही निधी मंजूर झाला आहे. लवकरच निविदा प्रकिया पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यातील १४०० कोटी रुपये फक्त रस्त्यासाठी देण्यात आले आहेत. त्याबाबतची माहिती काँग्रेस नेते नारायण राणे यांना देण्यात आली असल्याचेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
शासकीय महाविद्यालये मागण्यात गैर काय ?
काँग्रेस नेते नारायण राणे हे स्वत: महाविद्यालये उभारतात आणि दुसऱ्यांना मात्र बालवाडीची स्वप्ने दाखवितात. येथील गोरगरीब जनतेला खासगी महाविद्यालयाची फी झेपणार नाही, म्हणूनच आम्ही शासकीय महाविद्यालयाची मागणी केली आहे. त्यात गैर काय, असा सवाल करीत राणे यांच्याकडे नियोजन नसल्यानेच त्यांच्या सर्व योजना फसत गेल्या. त्यात ‘उत्तम स्टील’चाही समावेश करावा लागेल, असेही मंत्री केसरकर म्हणाले.

Web Title: I am the Captain of Gorargibhin: Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.