मी आता सिंधुदुर्गात आलोय; राणेंचा विरोधकांना इशारा, उद्या मालवणला जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 10:38 PM2024-08-27T22:38:11+5:302024-08-27T22:38:20+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी पडला असून यावरून देशभरात यावरून जोरदार टीका होत आहे.

I have now come to Sindhudurga; Narayan Rane's warning to opponents, will go to Malvan tomorrow shivaji maharaj statue fall  | मी आता सिंधुदुर्गात आलोय; राणेंचा विरोधकांना इशारा, उद्या मालवणला जाणार 

मी आता सिंधुदुर्गात आलोय; राणेंचा विरोधकांना इशारा, उद्या मालवणला जाणार 

सावंतवाडी : मी आता सिंधुदुर्गात आलो आहे.उद्या मालवण मध्ये जाणार कोणते येऊ दे मी उद्या बुधवारी मालवणात आहे असे म्हणत माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज याचा पुतळा पडल्या वरून सुरू असलेल्या राजकारणाचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी येत असलेल्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना टिकेचे लक्ष्य केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी पडला असून यावरून देशभरात यावरून जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार राणे हे मंगळवारी सायंकाळी उशिरा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी सावंतवाडीत काही काळ थांबले होते. त्यावेळी त्यानी कार्यकर्त्याशी चर्चा करून कणकवलीकडे मार्गस्थ झाले.

शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी स्वागत केले. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर प्रियंका नाईक माजी नगराध्यक्ष संजू परब राजू बेग मंदार नार्वेकर बंटी पुरोहित संजय वरेरकर आदि उपस्थित होते.

मालवण येथे मी उद्या बुधवारी दुपारी जाणार असून तेथे पत्रकार परिषद ही घेणार आहे. त्यावेळी काय ते सविस्तर बोलेन. विरोधी पक्षाचे नेते मालवणमध्ये येत असल्याबद्दल विचारले असता कोण कोण ते येऊदे वडेट्टीवार यांच्या मालवण दौऱ्यावर ही त्यांनी टीका केली. ते चड्डीत असताना मी गडचिरोलीत जात होतो असे म्हणत राणेंनी आपल्या आक्रमक स्वभावाची झलक दाखवली.

Web Title: I have now come to Sindhudurga; Narayan Rane's warning to opponents, will go to Malvan tomorrow shivaji maharaj statue fall 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.