आदर्श प्रतिष्ठानचे ‘आदर्श पाऊल’

By admin | Published: August 31, 2015 09:07 PM2015-08-31T21:07:29+5:302015-08-31T21:07:29+5:30

आधार : भालावल येथील महिलेला १५ दिवसांत दिले हक्काचे घर; २०१० साली अतिवृष्टीने घर जमिनदोस्त

Ideal Foundation's 'Model Step' | आदर्श प्रतिष्ठानचे ‘आदर्श पाऊल’

आदर्श प्रतिष्ठानचे ‘आदर्श पाऊल’

Next

महेश चव्हाण -ओटवणे  -भटक्या जमातीसाठी शासन जागा खरेदी करून घरे बांधून देते. मग निवासितांना बेघर का व्हावे लागते? अशा दु:खाने ग्रासलेल्या भालावल-लोहारवाडी येथील सुवासिनी लक्ष्मण गुळेकर यांना त्यांच्या हक्काचे घर १५ दिवसात उभे करून देत माजगाव येथील आदर्श प्रतिष्ठान संस्थेने समाजप्रणित आदर्शवादी पाऊल टाकले आहे.
गेली पाच वर्षे बेघर होऊन खितपत पडलेल्या या गरीब कुटुंबाला आदर्श प्रतिष्ठानने मदतीचा आधार देत स्ट्रक्टरची जवळजवळ ८० हजारांची निवासी रोड उभी करू न दिली. आदर्श प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत कासार यांनी सुवासिनी गुळेकर यांना घराची किल्ली सुपूर्द केली आणि दोन चिमण्या पाखरासह आईला हक्काचे सुरक्षित घरटे मिळाले आहे.
जुलै २०१० मध्ये अतिवृष्टीने लक्ष्मण गुळेकर यांचे मातीचे घर जमीनदोस्त झाले. पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडून केवळ आश्वासने व तुटपुंजी मदत मिळाली. त्यामुळे गुळेकर कुटुंबाने काही पैशांची जुळवाजुळव करून उभ्या केलल्या खोपटीत संसार सावरण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या वर्षीच घरातील कर्ता लक्ष्मण गुळेकर यांचे निधन झाल्याने सुवासिनी गुळेकर यांच्यावर आभाळ कोसळले. मांडलेला संसार जुळतो न जुळतो तोच पुन्हा विस्कटला. अन्न, वस्त्र, निवारा त्याचबरोबर दोन चिमुकल्या जिवांचे शिक्षण समोर असल्याने त्यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले होते. माणसासाठी सर्वाधिक महत्त्वाची आवश्यक गोष्ट म्हणजे डोक्यावर हक्काचे छप्पर. त्यानुसार शासनाकडे पायपीट झाली. बेघर असल्याचा दाखलाही मिळाला. पण जमिनीचा वाद आणि तांत्रिक अडचणी समोर आल्याने, शासनानेही उदासिनता दाखवल्यामुळे घराचे स्वप्न अधुरेच होते. या गरीब, असहाय्य महिलेली दु:ख गाथा आदर्श प्रतिष्ठनच्या कानी पडली आणि त्यांनी तत्काळ १५ आॅगस्ट रोजी पाहणी करत या महिलेला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. भालावलचे रहिवासी संजय गुळेकर यांनी याबाबत आदर्श प्रतिष्ठानकडे पाठपुरावा केला. त्यानुसार प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत कासार आणि सहकाऱ्यांनी प्रथमदर्शनी शासन योजनेतून घरकूल निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले; पण शासकीय निकष, सामाईक जमिनीचे वाद यामुळे अडचणी निर्माण झाल्या.
अखेर शासनाकडे गुडघे न टेकता आदर्श प्रतिष्ठानने स्वत: रकमेचा भार उचलित जवळजवळ ८० हजारांची निवासी स्ट्रक्चर शेड या गरीब कुटुंबाला १५ दिवसांत उभी करून दिली. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संदेश सावंत, मिलिंद पित्रे, विजय सावंत, यशवंत आयरे, बाळू वाळके, दत्तगुरू बोगवे, प्रकाश कांबळी, रूपेश नाटेकर, सोनू दळवी, पे्रमलता परब, अमित तावडे, रमेश साळगावकर, उपसरपंच समीर परब, आनंद दळवी, अनंत मेस्त्री आदी सर्वांनी मदतीचा हात पुढे केला. ओटवणे येथील अमित तावडे यांनीविनामोबदला शेड उभारून दिली आणि गुळेकर कुटुुंबाला हक्काचे घर मिळाले.

शिक्षणाची जबाबदारी
केवळ घरकुल देऊन न थांबता, या गरीब महिलेच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी संस्थेने उचलली आहे. कास येथील रामचंद्र दामोदर कुडके गुरूजींनी बांदा महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत असलेल्या दत्ताराम गुळेकर याच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली आहे.
बेघर यादीत नाव समाविष्ट असूनही व घरकुल मंजूर होऊनसुद्धा सामाईक जमीन व अन्य काही तांत्रिक कारणांमुळे घरकुल उभे राहू शकले नाही. पण, सुवासिनी गुळेकर यांना स्थानिक पातळीवर वेळोवेळी संस्थेकडून आर्थिक सहकार्य दिले जाईल.
- समीर परब, उपसरपंच, भालावल

Web Title: Ideal Foundation's 'Model Step'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.