जिल्ह्यातील महसूल विभागासाठी आदर्शवत ठरावे : दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 01:55 PM2019-02-05T13:55:59+5:302019-02-05T14:06:47+5:30
सावंतवाडी तहसिदार कार्यालयाची सुंदर वास्तू उभारली आहे. या इमारतीच्या फर्निचरचे काम अजून बाकी आहे. लवकरच ही सर्व कामे पूर्ण होतील व जिल्ह्यातील सर्वात सुंदर असे तहसिदार कार्यालय निर्माण होईल व जिल्ह्यातील महसूल विभागासाठी ही इमारत आदर्शवत अशी ठरेल असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केरसकर यांनी सावंतवाडी येथे तहसिलदार कार्यालयाच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमावेळी केले.
सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी तहसिदार कार्यालयाची सुंदर वास्तू उभारली आहे. या इमारतीच्या फर्निचरचे काम अजून बाकी आहे. लवकरच ही सर्व कामे पूर्ण होतील व जिल्ह्यातील सर्वात सुंदर असे तहसिदार कार्यालय निर्माण होईल व जिल्ह्यातील महसूल विभागासाठी ही इमारत आदर्शवत अशी ठरेल असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केरसकर यांनी सावंतवाडी येथे तहसिलदार कार्यालयाच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, माजी आमदार राजन तेली, सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पल्लवी राऊळ, सावंतवाडीचे राजे खेमराज सावंत, युवराज लखम राजे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रेश्मा सावंत, जिल्हा परिषद सदस्य शितल राऊळ, मायकल डिसोझा, राजन मुळीक, रोहिणी गावडे, पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, उपसभापती नेमळेकर, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसिलदार राजाराम म्हात्रे, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई, सुरेश गवस, ठेकेदार सुनिल केळूसकर, प्रसाद नार्वेकर आदींसह सावंतवाडी वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात
जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे सांगून पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, सर्व शासकीय इमारती या सुसज्ज व सुंदर होत आहेत. या वास्तूंच्या रुपातून नागरिकांनाही चांगल्या सुविधा मिळाव्यात. सध्या सावंतवाडीमध्ये वनसदृष्य जमिनीचा प्रश्न मोठा आहे. यावरही लवकरच तोडगा काढण्यात येईल. सध्या शिरशिंगेच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.
लवकरच कोलगावच्या रस्त्याच्या प्रश्नही सुटेल असा विश्वास व्यक्त करुन केसरकर म्हणाले की, सावंतवाडी येथे महसूलच नाही तर इतर सर्व कार्यालये एकत्र आणण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. एकाच ठिकाणी सर्व कार्यालये असल्यास नागरिकांना सोयीचे होईल व चांगल्या सुविधा पुरवता येतील. जिल्हा सुंदर बवनव्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. सावंतवाडी तालुक्यतील पाणी पुरवठा योजनांसाठी साडे पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे येत्या काळात तालुक्यामध्ये कोठेही पाण्याची समस्या निर्माण होणार नसल्याचेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.