...तर भाजपने जठारांना तिकीट का दिले ?

By admin | Published: July 6, 2016 10:59 PM2016-07-06T22:59:33+5:302016-07-07T00:52:22+5:30

नीतेश राणे : गोगटेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला

If BJP gave ticket to jatha? | ...तर भाजपने जठारांना तिकीट का दिले ?

...तर भाजपने जठारांना तिकीट का दिले ?

Next

देवगड : गोगटे घराण्याकडे २५ वर्षे आमदारकी होती. मात्र, अजित गोगटे विजयी आमदार असताना त्यांना तिकीट न देता भाजपने प्रमोद जठार यांना तिकीट दिले याचे अजित गोगटे यांनी आत्मपरीक्षण करावे. जर आपण एवढे कार्यकर्तृृत्ववान आमदार होतात तर प्रमोद जठार यांचा विचार करण्याची गरज पक्षाला का लागली, असा सवाल आमदार नीतेश राणे यांनी विचारला आहे.
नीतेश राणे म्हणाले, केवळ रस्ते हा विकास नाही तर ती मूलभूत सुविधा आहे. मी कायम हेच सांगत आहे. यानंतर खरी विकासाला सुरुवात होते. आप्पा गोगटे यांच्याबद्दल व्यक्तिगत आदर आहे. मात्र, भाजपचा देवगड मतदारसंघातील २९ वर्षांच्या कार्यकालाचे आत्मपरीक्षण जरूर करा. मी जनतेमधून फिरून संवाद साधत असतो. यावेळी जनता पाणी मागते, विजेची सोय मागते. आपल्याजवळ असणारी जामसंडे बौद्धवाडी गेली पन्नास वर्षे सिंंगल फेजवर होती. मी दोन महिन्यांत त्यांची विजेची समस्या दूर केली आहे.
तुमचा जनतेशी संवाद राहिला नाही म्हणून तुमचा पराभव झाला. कोकणमाती या संस्थेने समाजातील विविध गुणी व्यक्तींचा सत्कार केला आहे. समाजातील ज्या गोष्टी चांगल्या घडतात त्या गोष्टींना चांगले म्हणायला शिका. प्रत्येक वेळी राजकारण आणू नका. तारामुंबरी पुलासाठी माजी खासदार नीलेश राणे यांनी केंद्रीय मार्ग निधीकडे शिफारस करून निधी आणला. आनंदवाडी प्रकल्प व विजयदुर्ग बंदर यांची आखणी व प्राथमिक मंजुरीवेळी नारायण राणे हे मंत्री होते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या कार्यकालात ही कामे झाली आहेत. दुसऱ्याने केलेला विकास हा आपण केला असे म्हणून जनतेला फसविण्याचे दिवस गेले. बागायतदारांना नुकसानभरपाई नाही, सी-वर्ल्ड, विमानतळाचा प्रश्न अधांतरी आहे. आमच्यावर टीका करण्यापेक्षा जनतेच्या समस्या सोडवा. पत्रकार परिषदा घेऊन टीका करण्यापेक्षा काम करणे पसंत करणार आहे, असे राणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: If BJP gave ticket to jatha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.