भाजप चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडले कुठे, मंत्री दीपक केसरकर यांचा सवाल

By अनंत खं.जाधव | Published: October 9, 2023 04:16 PM2023-10-09T16:16:25+5:302023-10-09T16:18:57+5:30

आम्ही सहानुभूतीचे राजकारण करत नाही

If the election is contested on the BJP symbol, where will it go wrong says Minister Deepak Kesarkar | भाजप चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडले कुठे, मंत्री दीपक केसरकर यांचा सवाल

भाजप चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडले कुठे, मंत्री दीपक केसरकर यांचा सवाल

googlenewsNext

सावंतवाडी : पालघरमध्ये भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत असेल तर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात आमच्यातील एकाने भाजप चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडले कुठे असा सवाल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी किरण सामंत यांनी मोबाईलवर ठेवलेला स्टेटस हा राजकीय गंमत होती. ते कुठेही नाराज नसून ते लोकसभा निवडणुकीत उतरत असतील तर त्यांचा रात्र दिवस प्रचार करून निवडून आणू असेही त्यांनी यावेळी सागितले. मंत्री केसरकर हे आज, सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अशोक दळवी, शिवाजी सावंत, बबन राणे, बाबू कुडतरकर उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले, माझ्या खांद्यावर कोल्हापूर व मुंबई शहर अशा दोन ठिकाणच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. यातील कोल्हापूरच्या जबाबदारीतून मुक्त झालो आहे. त्यामुळे आता यापुढे मुंबई शहरमध्ये आठवड्यातून तीन दिवस देणार असून उर्वरित तीन दिवस सावंतवाडी मतदारसंघाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीत जीएसटी कौन्सिलच्या बैठकीसाठी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी या नात्याने तेथे गेलो होतो. यावेळी मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनेक प्रश्न मांडले त्याला सकारात्मक प्रतिसाद ही मिळाला. तसेच महाराष्ट्राचे अर्थ सचिव यांनी विशेष कौतुक केल्याचे सांगितले. 

सिंधुरत्नचा 65 कोटीचा निधी अखर्चित होता. अर्थ विभागाकडून हा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तीन पक्षाचे सरकार असले तरी हे निर्णय घेणारे सरकार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोणतेच निर्णय होत नव्हते. त्यामुळे कबुलायातदार प्रश्न मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाचा प्रश्न मार्गी लागू शकला नव्हता. तो प्रश्न मार्गी लागला तो फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून लागला असल्याचे ते म्हणाले.

दसरा मेळावा शिवाजी पार्कवर नाही

आम्ही सहानुभूतीचे राजकारण करत नाही. आम्ही विकासाचे राजकारण करतो. त्यामुळेच वादात न जाता दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क ऐवजी दुसरे मैदान आम्ही घेतले आहे. त्यामुळे ठाकरे गट स्वत:च राजकारण करतो आणि स्वत:च प्रसिद्धी मिळवतो हे आता जनतेने ओळखावे असे आवाहन केसरकर यांनी केले.

Web Title: If the election is contested on the BJP symbol, where will it go wrong says Minister Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.