वेळ आल्यास बारसुतील जमिनींचे ७/१२ जाहीर करू, नितेश राणेंचा ठाकरेंना इशारा

By सुधीर राणे | Published: April 28, 2023 05:05 PM2023-04-28T17:05:03+5:302023-04-28T17:05:35+5:30

खासदार संजय राऊत डुब्लिकेट शिवसैनिक 

If time comes we will declare 7/12 of the lands in Barsu, MLA Nitesh Rane warning to Thackeray | वेळ आल्यास बारसुतील जमिनींचे ७/१२ जाहीर करू, नितेश राणेंचा ठाकरेंना इशारा

वेळ आल्यास बारसुतील जमिनींचे ७/१२ जाहीर करू, नितेश राणेंचा ठाकरेंना इशारा

googlenewsNext

कणकवली : महाविकास आघाडीलाच उद्धव ठाकरे यांचे ओझे झाले आहे. त्यामुळेच १ मे रोजी 'मविआ'ची शेवटची सभा होणार आहे. त्यानंतर वज्रमूठ सभा होणारच नाही. खासदार संजय राऊत यांनी कोण कोणाचे ओझे झाले आहे, हे शोधण्यापेक्षा यापुढे महाविकास आघाडीचे कसे होणार यावर बोलावे. राजापूर बारसू रिफायनरी प्रकल्पातउद्धव ठाकरे यांच्याशी निगडित, त्यांच्या जवळच्या कोणी, कोणी जमिनी घेतल्या हे सांगण्याची वेळ आणल्यास सातबारा सकट यादी जाहीर करू असा इशाराच आमदार नितेश राणे यांनी दिला. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

आमदार नितेश राणे म्हणाले, स्वतःला पवारांचा माणूस म्हणून घेणारे  खासदार संजय राऊत हे  बारसु प्रकरणी पवार यांच्या भूमिकेला विरोध करतात. आमच्या राहुल कुल यांनी इशारा देताच संजय राऊत यांनी इतर साखर कारखान्यांवरील चौकशीचा मुद्दा घेतलेला आहे. याचा अर्थ पवारांच्या साखर कारखान्यांची चौकशी संजय राऊत यांना हवी आहे. यातूनच हे राऊत ना उद्धव ठाकरेंचे, ना पवारांचे हे स्पष्ट झालेले आहे. हे राजकारणातील लावारिस आहेत काय ? असा सवाल सुद्धा नितेश राणेंनी केला. 

बारसू येथील रिफायनरीसाठी जमिनी कोणाच्या आहेत ? याची जंत्री खोलात जाऊन खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांना काढायची असेल तर त्यांनी जरूर काढावी. यापूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी काही नावांची यादी जाहीर केलेली आहे. यात ठाकरेंच्या नावाची आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या कशा जमिनी आहेत हे त्यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे राऊत यांना आपल्या मालकाला आणखीन अडचणीत जायचे असेल तर निश्चितच त्या याद्या जाहीर कराव्यात. मग आम्ही उद्धव ठाकरे यांच्या निगडित असणाऱ्या लोकांच्या जमिनींचे सातबारा  दाखवू.

राऊत डुब्लिकेट शिवसैनिक 

स्वतःला कडवट शिवसैनिक म्हणणारे खासदार संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मोठमोठी विधाने करतात. त्यांना शिवसेनेचा स्थापना दिवस माहित नाही. त्यांना बाळासाहेबांवर बोलण्याचा नैतिक अधिकार सुद्धा नाही १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. हे संजय राऊत यांना माहित नाही. यातूनच ते डुब्लिकेट शिवसैनिक आहेत. चायनीज मॉडेल आहेत हे दिसून येते. शिवसेना पक्ष आणि त्याचे चिन्ह धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष दुसरा कोणत्याही नेत्यांनी आपला म्हणणे म्हणजेच निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा अपमान करणे आहे. ठाकरे किंवा संजय राऊत यांना शिवसेना बोलायचेच असेल तर त्यांनी 'उबाठा'सेना असे बोलावे. अन्यथा तो निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा अपमान होईल. या संदर्भात आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार असल्याचेही आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: If time comes we will declare 7/12 of the lands in Barsu, MLA Nitesh Rane warning to Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.