लॉकडाऊनमधला हा चोरटा उद्योग पोलिसांनी रोखला! म्हणून सापडली .. गोव्यातून निघाले होते कोल्हापूरला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 11:18 AM2020-04-30T11:18:55+5:302020-04-30T11:22:35+5:30

 गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर बांदा पोलीस गोव्यातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करत असताना काल बुधवारी रात्रौ १० वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी महेश भोई यांना या ट्रकचा संशय आल्याने त्यांनी ट्रकची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली.

Illegal liquor smuggled from Goa to Kolhapur by truck | लॉकडाऊनमधला हा चोरटा उद्योग पोलिसांनी रोखला! म्हणून सापडली .. गोव्यातून निघाले होते कोल्हापूरला..

लॉकडाऊनमधला हा चोरटा उद्योग पोलिसांनी रोखला! म्हणून सापडली .. गोव्यातून निघाले होते कोल्हापूरला..

googlenewsNext
ठळक मुद्देचोरटी दारूची वाहतूक नेण्याचा प्रयत्न१२ लाखाचा ट्रक मिळून १२ लाख ६४ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बांदा : लॉकडाऊन असताना केवळ अत्यावश्यक सेवेचा परवाना असल्याचा गैरफायदा अनेक वाहनधारक असल्याचे उघड झाले आहे. अशाच छुप्या पद्धतीने गोव्यातून कोल्हापूर येथे ट्रकमधून अवैधरित्या दारू नेण्याचा प्रयत्न बांदा पोलिसांनी हाणून पाडला. या कारवाई ६४ हजार ७१० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. तसेच याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.
         गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर बांदा पोलीस गोव्यातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करत असताना काल बुधवारी रात्रौ १० वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी महेश भोई यांना या ट्रकचा संशय आल्याने त्यांनी ट्रकची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली.
         
या अवैध दारू वाहतुक प्रकरणी १२ लाखाचा ट्रक मिळून १२ लाख ६४ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्या आला. तर आमिर आदम वाळवेकर व हसन अल्लाउद्दीन पटेकरी(दोघेही रा.इचलकरंजी, कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद, एच.जे.धुरी, दीपक शिंदे, सुमित चव्हाण, रवींद्र देवरुखकर, दिलीप धुरी, मनीष शिंदे यांनी केली.

Web Title: Illegal liquor smuggled from Goa to Kolhapur by truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.