तेरेखोल नदीपात्रात बेकायदा वाळू उत्खनन, महसूलची धडक कारवाई; वाळू तस्कर पळाले 

By अनंत खं.जाधव | Published: September 30, 2023 03:23 PM2023-09-30T15:23:38+5:302023-09-30T15:25:36+5:30

महसूल विभागाने रॅम्पसह होडी जाळली 

Illegal Sand Mining in Terekhol River Basin, Strike action by the Revenue Department | तेरेखोल नदीपात्रात बेकायदा वाळू उत्खनन, महसूलची धडक कारवाई; वाळू तस्कर पळाले 

तेरेखोल नदीपात्रात बेकायदा वाळू उत्खनन, महसूलची धडक कारवाई; वाळू तस्कर पळाले 

googlenewsNext

सावंतवाडी : तेरेखोल नदीपात्रातील भागात खाडीलगत आरोंदा सावरजुवा येथे बेकायदा वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू होते. यावर शनिवारी पहाटेच्या सुमारास सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांच्यासह पोलीस पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली. यावेळी वाळू उपसा करणारे गोवा हद्दीत पळून गेले मात्र जागेवर असलेला वाळू रॅम्प सह साहित्य महसूल विभागाने जाळून टाकले. या कारवाईने वाळू तस्कराचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.

तेरेखोल नदी पात्रातील आरोंदा सावरजुवा येथे वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच महसूल व पोलीस यानी संयुक्त मोहीम राबवली यात एक होडी वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ यंत्रणेने वाळू उपसा करणाऱ्या होडीचा पाठलाग केला असता  वाळू तस्करी करणारे गोवा हद्दीत पळून गेले. गोवा हद्दीतील वाळू तस्करी करणाऱ्या व्यक्तीने आपल्या होडीसह पलायन केले. मात्र वाळू उपसा करणारे साहित्य ते महाराष्ट्र हद्दीत टाकून पळाले.

महसूल विभागाकडून हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच वाळू रॅम्प व इतर साहित्य जाळून नष्ट करण्यात आले. ही कारवाई सकाळी तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाणोली तलाठी भाऊसाहेब चितारे, आरोंदा तलाठी पोले, आरोंदा उपसरपंच  सुभाष नाईक, आरोंदा कोतवाल जाधव व पोलीस कर्मचारी दळवी यांनी केली आहे.

मेरीटाईम बोर्डाने लक्ष देणे गरजेचे

तेरेखोल नदीपात्रात परवानगी नसताना होडी कशा काय उतरतात याबाबत मेरीटाईम बोर्डाने याकडे लक्ष देऊन पाण्यात उतरणाऱ्या होडी व बोटी यांना परवानगी आहे का याची तपासणी करणे आवश्यक आहे. आणि अशी जर तपासणी मेरीटाईम बोर्डाने केली तर निश्चितपणे अनधिकृतपणे वाळू तस्करी करणाऱ्याना आळा बसेल. असे स्पष्ट केले.

Web Title: Illegal Sand Mining in Terekhol River Basin, Strike action by the Revenue Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.