अवैध मद्यसाठा : आरोपीला ५० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 06:36 PM2021-03-11T18:36:20+5:302021-03-11T18:37:55+5:30

liquor ban Sindhudurg- वैभववाडी तालुक्‍यात अवैध मद्यसाठा बाळगून वाहतूक केल्याप्रकरणी आरोपी दिनेश महादेव गुरव (रा. वेंगसर, वैभववाडी) याला ५० हजारांची दंडात्मक शिक्षा कणकवली न्यायालयाच्या न्यायाधीश दीपिका पाटील यांनी सुनावली आहे.

Illegal stockpiling of liquor: Accused fined Rs 50,000 | अवैध मद्यसाठा : आरोपीला ५० हजारांचा दंड

अवैध मद्यसाठा : आरोपीला ५० हजारांचा दंड

googlenewsNext
ठळक मुद्दे अवैध मद्यसाठा : आरोपीला ५० हजारांचा दंड न्यायालयाने ठरवले दोषी

कणकवली : वैभववाडी तालुक्‍यात अवैध मद्यसाठा बाळगून वाहतूक केल्याप्रकरणी आरोपी दिनेश महादेव गुरव (रा. वेंगसर, वैभववाडी) याला ५० हजारांची दंडात्मक शिक्षा कणकवली न्यायालयाच्या न्यायाधीश दीपिका पाटील यांनी सुनावली आहे.

वैभववाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनेश महादेव गुरव (रा. वेंगसर, वैभववाडी) याला अवैध मद्यसाठा ताब्यात बाळगून वाहतूक केल्याप्रकरणी व वाहतूक परवाना नसताना गाडी चालविल्याप्रकरणी मंगळवारी कणकवली न्यायालयाच्या न्यायाधीश दीपिका पाटील यानी दोषी ठरविले आहे.

अवैध मद्यसाठा बाळगून वाहतूक केल्याप्रकरणी आरोपी दिनेश गुरव याला कलम ६५(अ)नुसार २५,००० रुपये दंड व ६५(ई)नुसार २५,००० रुपये व मोटार वाहन कायदा कलम ३/१८१ साठी १०० रुपये दंड, कलम १३०/१७७ साठी १०० रुपये असे एकूण ५० हजार २०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे, पोलीस हवालदार संजय खाडे यांनी केला होता. सरकारी पक्षातर्फे ॲड. गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.

Web Title: Illegal stockpiling of liquor: Accused fined Rs 50,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.