Sindhudurg: अवैधरीत्या दारू वाहतूक, दहा लाखाचा मुद्देमाल जप्त; एकजण ताब्यात 

By अनंत खं.जाधव | Published: November 24, 2023 05:45 PM2023-11-24T17:45:33+5:302023-11-24T17:46:48+5:30

सावंतवाडी : बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने मळेवाड येथे एकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ...

Illegal transportation of liquor, One person detained with valuables worth ten lakhs | Sindhudurg: अवैधरीत्या दारू वाहतूक, दहा लाखाचा मुद्देमाल जप्त; एकजण ताब्यात 

Sindhudurg: अवैधरीत्या दारू वाहतूक, दहा लाखाचा मुद्देमाल जप्त; एकजण ताब्यात 

सावंतवाडी : बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने मळेवाड येथे एकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कारसह दारू असा मिळून सव्वा दहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रदिप विश्वनाथ निग्रे (रा.खारेपाटण कणकवली) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. ही कारवाई काल, गुरुवारी करण्यात आली. 

मळेवाड जंक्शन येथे वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीचे विदेशी मद्याच्या विविध ब्रॅण्डचे एकुण ४० बॉक्स असा अवैध मद्यसाठा मिळून आला. या प्रकरणी प्रदिप विश्वनाथ निग्रे याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. यात २ लाख २४ हजार किंमतीचे मद्य तसेच ८ लाख किंमतीचे चारचाकी वाहन असा एकुण १० लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप रास्कर, गोपाळ राणे, दिपक वायदंडे, प्रसाद माळी ,  रणजीत शिंदे यांनी केली. या प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक टी. बी. पाटील हे करीत आहेत.

Web Title: Illegal transportation of liquor, One person detained with valuables worth ten lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.