माझी लढाई व्यक्ती नाही; तर प्रवृत्तीविरोधात : केसरकर, वाढदिनी मान्यवरांकडून शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:01 PM2019-07-20T12:01:44+5:302019-07-20T12:04:04+5:30

सिंधुदुर्गात करण्यासारखे भरपूर आहे. फक्त येथील जनतेची साथ मिळाली तर यापेक्षा आणखी काम करून दाखवेन, आता विकासाची गंगा तुमच्यापर्यंत पोहोचण्यास सुरूवात होणार आहे. तुमच्या प्रेमाची उतराई ही मला तुमच्या कल्याणातून करायची आहे, असे भावनिक उद्गार राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काढले.

 I'm not a fighting person; Against the tendency: Deepak Kesarkar | माझी लढाई व्यक्ती नाही; तर प्रवृत्तीविरोधात : केसरकर, वाढदिनी मान्यवरांकडून शुभेच्छा

माझी लढाई व्यक्ती नाही; तर प्रवृत्तीविरोधात : केसरकर, वाढदिनी मान्यवरांकडून शुभेच्छा

Next
ठळक मुद्दे माझी लढाई व्यक्ती नाही; तर प्रवृत्तीविरोधात : दीपक केसरकर वाढदिनी मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सावंतवाडी : अधिकाऱ्यांना मारहाण झाली तर अधिकारी पुन्हा जिल्ह्यात येणार नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील महत्त्वाची अनेक पदे रिक्त आहेत. माझी लढाई ही व्यक्तीशी नसून प्रवृत्तीशी आहे. त्यामुळे काही प्रसंगात मला कठोर व्हावे लागते. सिंधुदुर्गात करण्यासारखे भरपूर आहे. फक्त येथील जनतेची साथ मिळाली तर यापेक्षा आणखी काम करून दाखवेन, आता विकासाची गंगा तुमच्यापर्यंत पोहोचण्यास सुरूवात होणार आहे. तुमच्या प्रेमाची उतराई ही मला तुमच्या कल्याणातून करायची आहे, असे भावनिक उद्गार राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काढले.

मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात चांदा ते बांदा योजनेतून जॅम्प नेटवर्कच्या माध्यमातून बचतगटांना कोंबडीची पिल्ले तसेच नोकरीचे पत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्नी पल्लवी केसरकर, राज्याचे मत्स्य व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, आमदार वैभव नाईक, माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, मुख्यकार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उद्योजक नंदूशेठ घाटे, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, युवानेते संदेश पारकर, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, सचिन वालावलकर, उद्योजक हर्ष साबळे, प्रांताधिकारी सुशात खांडेकर, नगरपालिका मुख्याधिकारी जयंत जावडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, वहिनी शितल केसरकर, मुलगी सोनाली केसरकर, जावई रोहन वगळ, कुडाळ सभापती राजन जाधव, अश्विन राऊत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर माजी नगरसेवक गोविंद वाडकर आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, जनतेच्या आशीर्वादाने मला काम करण्याची संधी मिळाली चांदा ते बांदा या योजनेतून जनतेचे कल्याण करण्याची संधी आली आहे. त्यामुळेच यातून वेगवेगळ््या योजना राबविण्याचे काम सुरू आहे. मी निधी आणला पण त्यांची प्रसिद्धी केली नाही. कुठल्या ही क्षेत्रात निधी कमी पडणार याची मी नेहमी काळजी घेतली आहे. काही जण टीका करतात पण त्यातून मी अभ्यास केला. बोलणारे काम करत नाही न बोलणारे अधिक काही तरी करून दाखवत असतात असे ही त्यांनी यावेळी सांगितले. जनतेच्या प्रेमाची उतराई विकासातून करायची असते असे सांगत कोणा विरोधात मी कडक भुमिका घेत नाही. कधी ही पदाचा गैरवापर केला नाही, आणि करणार ही नाही.

पण एखादे काम होत असताना त्याला विरोध करू नका. सावंतवाडीतील रस्त्याचे काम काही जणांनी बंद पाडले हे अयोग्य होते. आता त्या रस्त्यांची कामे सावकाश होणार याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केला. माझी लढाई ही व्यक्ती विरोधात नसून प्रवृत्ती विरोधात असल्याचेही यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले.

Web Title:  I'm not a fighting person; Against the tendency: Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.