"महाराष्ट्राने माझं काम पाहिलं, माजी नगराध्यक्षाला उत्तर देण्याएवढा मी लहान नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 11:14 PM2022-11-12T23:14:55+5:302022-11-12T23:15:34+5:30

ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थित होते.

"I'm not young enough to answer to the former mayor, Deepak kesarkar in sawantwadi | "महाराष्ट्राने माझं काम पाहिलं, माजी नगराध्यक्षाला उत्तर देण्याएवढा मी लहान नाही"

"महाराष्ट्राने माझं काम पाहिलं, माजी नगराध्यक्षाला उत्तर देण्याएवढा मी लहान नाही"

googlenewsNext

सावंतवाडी : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी जे काही काम केले आहे ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे एका शहराच्या माजी नगराध्यक्षाला उत्तर देण्याएवढा मी लहान नाही. मी माझे काम निधी आणून दाखवून दिले आहे,पण यानाच काम करायला जमले नाही त्याला मी काय करू असा जोरदार पलटवार  शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थित होते. मंत्री केसरकर म्हणाले,आगामी काळात होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूका या भाजपा आणि शिंदे गटाने एकत्र मिळूनच लढविण्यात याव्यात तसे माझे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले असून ते ही सकारात्मक आहेत.आता कार्यकर्त्यांशी चर्चा करुन याबाबतची अधिकृत घोषणा मी आणि पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र  चव्हाण एकत्रितरीत्या मुंबईत करू, अशी भूमिका मंत्री केसरकर मांडली.

मी सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी दिला मात्र त्याचा कधी गाजावाजा केला नाही श्रेयासाठी भूमिपूजने ही केली नाहीत सावंतवाडी शहरातील तर संत गाडगेबाबा भाजी मंडई साठी नव्याने 18 कोटीचा निधी आणला आहे. त्याचेही लवकरच भूमिपूजन होणार आहे मी केलेली अनेक विकासात्मक कामे दिसतात मात्र मोठ्या प्रमाणात निधी देऊन सुद्धा त्या निधीचे योग्य नियोजन करण्यात साळगावकर अपयशी ठरले मग त्यांनी माझ्याकडे बोट कशासाठी दाखवायचे असा सवाल ही मंत्री केसरकर यांनी केला मला त्यांच्यावर टीका करण्यात अजिबात रस नाही मात्र त्यांनी कोणतेही सकारात्मक काम सांगितले असेल तर मी त्याला चांगला प्रतिसाद देईन असे मंत्री केसरकर म्हणाले. या ठीकाणी सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीला मतदान केले. त्यांनी आगामी काळात होणार्‍या ग्रामपंचायत निवडणूका शिंदे गट आणि भाजपा एकत्र मिळून लढवाव्यात, अशी आमची इच्छा आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्याशी चर्चा करण्यात येणार आहे. असे ही स्पष्ट केले.


 

Web Title: "I'm not young enough to answer to the former mayor, Deepak kesarkar in sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.