‘रायगडचा राजकैदी’मधून उमटविला ठसा

By admin | Published: December 19, 2014 09:54 PM2014-12-19T21:54:44+5:302014-12-19T23:54:07+5:30

ऐतिहासिक नाटक : पार्सेकर दशावतारी नाट्यमंडळाची निर्मिती

Impression of 'Raigad Rajkabadi' | ‘रायगडचा राजकैदी’मधून उमटविला ठसा

‘रायगडचा राजकैदी’मधून उमटविला ठसा

Next

वेंगुर्ले : वेंगुर्ले येथील पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाने यावर्षी निर्मिती केलेले ‘रायगडचा राजकैदी’ हे ऐतिहासिक नाटक समाजातील लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करीत आहे.
वेंगुर्ले येथील पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ दरवर्षी ट्रिकसिनयुक्त नाटकांची निर्मिती करते. यावर्षी समाजातील लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी यासाठी ‘रायगडचा राजकैदी’ या नाटकाची निर्मिती करून ऐतिहासिक नाटकामध्येही आपला वेगळा ठसा उमटविला आहे. या नाटकामध्ये रथारूढ सूर्यदेव, शुक्रमुनी दर्शन, भवानी माता, वाघाशी झुंज, साखळदंडातील जेरबंद कैदी, सरकती शिवपिंडी, भगव्या पताकांचे भाले होणे, धडापासून उडविलेले शिर, स्वप्न साक्षात्कार असे एकापेक्षा एक ट्रिकसिन लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच आनंद नार्वेकर, बाबा कामत, पप्पू नांदोसकर, रामचंद्र रावले, चारुदत्त तेंडोलकर, नितीन आशियेकर, प्रशांत मयेकर, सुधीर हळदणकर, आपा चव्हाण, रामू शिंगाडे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
या नाटकाला बाबल गावकर-हार्मोनियम, राकेश रेडकर- पखवाज, हरेश नेमळेकर (तालरक्षक) यांनी संगीतसाथ दिली आहे. गौरव पार्सेकर यांची प्रकाशयोजना आहे. नाटक यशस्वी होण्यासाठी मामा दळवी, दत्ताराम गोडकर, भाऊ कुबल, समीर ताम्हणकर, आनंद दाभोलकर, बाळा पावसकर, अर्जुन परब, रवी बांदेकर यांनी सहकार्य केले आहे. मालक प्रभाकर पार्सेकरांच्या संकल्पनेतून नाटकाची निर्मिती झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Impression of 'Raigad Rajkabadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.