काळ आला होता.. पण वेळ नाही; ट्रकसह कार 100 फूट खोल दरीत कोसळूनही जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 03:35 PM2022-04-08T15:35:21+5:302022-04-08T15:36:05+5:30

नेमका अपघात कसा झाला हे समजले नसले तरी दोन्ही वाहने १०० फूट खोल दरीत कोसळली. अपघात स्थळी कार ही ट्रकखाली चिरडली.

In Fondaghat, a truck and an Alto car crashed into a 100 foot deep ravine | काळ आला होता.. पण वेळ नाही; ट्रकसह कार 100 फूट खोल दरीत कोसळूनही जीवितहानी टळली

काळ आला होता.. पण वेळ नाही; ट्रकसह कार 100 फूट खोल दरीत कोसळूनही जीवितहानी टळली

googlenewsNext

कणकवली  : फोंडाघाटात ट्रक आणि अल्टो कार 100 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. याअपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली आहे. दाजीपूर खिंडीपासून फोंडयाच्या दिशेने सुमारे 3 किमी अंतरावर आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला.

याबाबत माहिती अशी, रंजित बाळासो भांडवले (वय 31, रा. भडगाव, ता कागल, जि. कोल्हापूर ) हे अल्टो कार क्र. ( MH-06-AN-7787) मधून प्रवास करत होते. तर ट्रकचालक मोहम्मद बापूसो मुजावर (55, रा.कागल, जि.कोल्हापूर ) हे ट्रक क्र. ( MH-41-G-5355) चालवत होते. नेमका अपघात कसा झाला हे समजले नसले तरी दोन्ही वाहने १०० फूट खोल दरीत कोसळली. अपघात स्थळी कार ही ट्रकखाली चिरडली.

मात्र कार चालक रंजित भांडवले यांनी सीटबेल्ट लावल्याने ते बचावले आहेत. भांडवले हे किरकोळ जखमी आहेत. तर ट्रकचालक मोहम्मद मुजावर आणि ट्रकमधील सहप्रवासी सुभाष शिवाजी देसाई, दत्तात्रय बाबुराव देसाई ( दोघे रा. मसवे, भुदरगड जि. कोल्हापूर ) हे जखमी झाले आहेत.

घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी जात दरीत उतरून सर्व अपघातग्रस्त जखमींना सुखरूप दरीतून बाहेर काढले. घटनास्थळी कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, सागर मचाळ, हायवे वाहतूक पोलीस हवालदार दिलीप पाटील, हवालदार अण्णा घारकर दाखल झाले आहेत.

Web Title: In Fondaghat, a truck and an Alto car crashed into a 100 foot deep ravine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.