सावंतवाडीत तृतीयपथींयांचा धिंगाणा, पोलिसांंनी चौघांना ताब्यात घेतले
By अनंत खं.जाधव | Published: June 10, 2023 03:59 PM2023-06-10T15:59:59+5:302023-06-10T16:27:02+5:30
सावंतवाडी : येथील माठेवाडा भागात चौघा तृतीयपथींयांनी धिंगाणा घातला. तसेच त्या ठिकाणी राहणार्या एका वकिलाच्या कार्यालयात जावून चोरी केली,धक्काबुक्की ...
सावंतवाडी : येथील माठेवाडा भागात चौघा तृतीयपथींयांनी धिंगाणा घातला. तसेच त्या ठिकाणी राहणार्या एका वकिलाच्या कार्यालयात जावून चोरी केली,धक्काबुक्की केली, तसेच लहान मुलांची छेड काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली.
याबाबतची माहिती माठेवाडा येथील नागरिकांकडून पोलीसांना देण्यात आली दरम्यान त्या चौघांना पोलिसांंनी ताब्यात घेतले. मात्र चौकशी अंती त्यांना सावंतवाडीच्या बाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे.
चौघे तृतीयपंथी सावंतवाडी शहरात आले होते. पण आल्यापासून गेले चार दिवस ते धुमशान घालत होते. यावेळी जबरदस्तीने पैसे मागणे तसेच दुकानदारांच्या गल्ल्यातील पैसे काढणे, लहान मुलांना त्रास देणे असा प्रकार त्यांच्याकडुन सुरू होता. दरम्यान सकाळी त्यांनी माठेवाडा भागात एका वकिलाच्या कार्यालयात जावून त्या ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तसेच एकाच्या खिशातील पैसे हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना काही नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांचा पाठलाग करुन पकडण्यात आले व सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान पोलिस उपनिरिक्षक सुरज पाटील, हवालदार प्रसाद कदम या दोघांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी त्यांची चौकशी केली. परंतु आपण पुन्हा असा प्रकार करणार नाही, असे त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना शहरातून बाहेर जावे, या अटीवर सोडून देण्यात आले आहे.