भविष्यात जगावर अर्थिक मंदीचे सावट येईल- सुरेश प्रभू

By अनंत खं.जाधव | Published: October 9, 2022 09:02 PM2022-10-09T21:02:53+5:302022-10-09T21:03:28+5:30

पर्यावरणीय बदल जगाची गंभीर परिस्थिती निर्माण करणारी ठरेल, असेही ते म्हणाले

In the future, the world will face economic recession - Suresh Prabhu | भविष्यात जगावर अर्थिक मंदीचे सावट येईल- सुरेश प्रभू

भविष्यात जगावर अर्थिक मंदीचे सावट येईल- सुरेश प्रभू

Next

सावंतवाडी: दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची आर्थिक घडी बिघडत चालली आहे असे चित्र दिसत आहे. त्यामुळे भविष्यात जगावर जागतिक आर्थिक मंदीचे सावट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी  व्यक्त केले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. "जागतिक पातळीवर आयात निर्यात वाढत गेली तरच आर्थिक प्रगती होते. आर्थिक व्यापार कमी व्हायला लागला की अस्तव्यवस्थेवर परिणाम होतो. युक्रेन युद्धामुळे  उर्जेवर परिणाम होईल. त्यामुळे अर्थव्यवस्था बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युरोप अमेरिकेमध्ये थंडी सुरू झाल्यानंतर विजेची मागणी वाढणार आहे.त्याचे परिणाम सर्वानाच भोगावे लागतील तिकडे विजेची मागणी वाढल्यास आणि पुरवठा कमी होईल. त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे," असे प्रभू म्हणाले.

"दुसऱ्या महायुद्धानंतर आता अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. युक्रेन युद्धामुळे ऊर्जा निर्मिती वर परिणाम होईल.पुढील काळात मानव जगणार की नाही असा परिणाम करणारी अर्थव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. जगावर पर्यावरणीय बदलामुळे हवामानाचा देखील परिणाम होणार आहे. जगातील अनेक देशातील नद्या या कोरड्या पडत आहेत. पर्यावरणीय बदल जगाची गंभीर परिस्थिती निर्माण करणारी ठरेल," अशी भीती प्रभू यांनी व्यक्त केली.

"जैवविविधता, नद्या हे फारच महत्त्वाचे आहे. पश्चिम घाटा बरोबर इतर प्रदेश हे जागतिक पातळीवर पर्यावरण रक्षण करणारे होते. दोन्ही ठिकाणी परिणाम झाला तर हवामान बदलाची मोठी शक्यता आहे. समुद्रात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे, ती नष्ट होण्याची भीती आहे. तसे झाले तर माशापेक्षा प्लास्टिकच वाढेल. देशाला पर्यावरणीय बदलाचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संरक्षणाची गरज आहे.जगाची वाटचाल अत्यंत कठीण आणि भयंकर मार्गावर चालली आहे," असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Web Title: In the future, the world will face economic recession - Suresh Prabhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.