ठाकरे सेनेत अतुल रावराणेंनी प्रथम स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे, नितेश राणेंचा टोला

By सुधीर राणे | Published: March 27, 2023 05:45 PM2023-03-27T17:45:06+5:302023-03-27T17:45:51+5:30

ठाकरे सेनेतील नेते कमिशन एजंट

In the Thackeray Sena Atul Ravaran should create his own existence first says Nitesh Rane | ठाकरे सेनेत अतुल रावराणेंनी प्रथम स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे, नितेश राणेंचा टोला

ठाकरे सेनेत अतुल रावराणेंनी प्रथम स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे, नितेश राणेंचा टोला

googlenewsNext

कणकवली: ठाकरे सेनेत स्वतःचे अस्तित्व घालवून बसलेल्या अतुल रावराणे यांनी प्रथम पक्षात स्वतःची पत निर्माण करावी. त्यानंतरच आमच्यावर भाष्य करावे. तुम्ही करत असलेल्या सामाजिक कार्याची पक्ष तरी दखल घेतो आहे का? याचा विचार करावा असा टोला भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेचे सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणे यांना लगावला आहे.

देवगड येथे अतुल रावराणे यांनी केलेल्या टीकेला आमदार नितेश राणे यांनी प्रसिध्दी पत्रातून प्रत्युत्तर दिले. जिल्हाप्रमुख बनून जिल्ह्याची सूत्रे हाती घेण्याची स्वप्न पाहणारे अतुल रावराणे खासदार विनायक राऊत यांचे खास असतानाही त्यांना सहसंपर्कप्रमुख पदावर बोळवण करण्यात आली आहे. यापेक्षा दुसरे वाईट काय असणार?  यातूनच त्यांनी आपली स्वतःची लायकी ओळखावी आणि आमच्यावर टीका करावी.

देवगड येथील शेतकऱ्यांचे दुःख पुसण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी तुम्हाला पाठवले असे तुम्ही सांगता याचा अर्थ नव्याने  मतदार संघ निहाय जिल्हाप्रमुखांच्या नियुक्त्या केल्या त्या जिल्हाप्रमुखांचे काही अस्तित्व राहिलेले नाही हे सिद्ध होते. यापुर्वीच्या ठाकरे सरकारने कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यांवर फार मोठा अन्याय केला. मी दिलेली विकास कामे रद्द केली. जिल्हा नियोजन मधील कामे वगळण्यात आली. मात्र शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेवर येताच दोन हजार कोटी रुपयांचा निधी मतदार संघात विकासासाठी आणला आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान सडक योजना आणि जलजीवन योजनेअंतर्गत स्वतंत्र निधी आणला आहे. त्यामुळे आमची सत्ता असताना विकास कसा होतोय याचा फरक रावराणे यांनी उघड्या डोळ्यांनी पाहावा.

ठाकरे सेनेत प्रत्येक नेता कमिशन एजंट

राणे कुटुंब हे व्यावसायिक आहेत. आम्ही उद्योजक म्हणूनच काम करतो. आम्ही कमिशन एजंट नाही. ठाकरे सेनेत प्रत्येक नेता कमिशन एजंट आहे अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
 

Web Title: In the Thackeray Sena Atul Ravaran should create his own existence first says Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.