शरद पवारांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील गटबाजी उघड
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 1, 2022 02:19 PM2022-10-01T14:19:52+5:302022-10-01T14:20:19+5:30
बांदा ( सिंधुदुर्ग ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट असल्याचे आजच्या स्वागत कार्यक्रमात दिसून आले. पक्षाचे अध्यक्ष ...
बांदा (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट असल्याचे आजच्या स्वागत कार्यक्रमात दिसून आले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर पत्रादेवी येथे राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा नेते अबिद नाईक यांनी स्वागत केले. त्यानंतर कट्टा कॉर्नर चौकात जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण विभाग महिला आघाडी अध्यक्ष अर्चना घारे -परब यांच्या नेतृत्वाखाली स्वागत करण्यात आले.
बांद्यातच दोन्ही गटांकडून स्वागत झाल्याने सिंधुदुर्ग राष्ट्रवादीत दुफळी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळी १०.३० वाजता पत्रादेवी सीमेवर सर्वप्रथम माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अबिद नाईक, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, शफिक खान, शैलेश लाड, सुरेश गवस, रिद्धी परब, रोहन परब, आसिफ ख्वाजा यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्वागत केले. या ठिकाणी स्वागत स्विकारल्यानंतर पवार बांद्याच्या दिशेने रवाना झालेत.
बांदा कट्टा कॉर्नर चौकात जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण आघाडी अध्यक्षा अर्चना घारे-परब, व्हिक्टर डान्टस, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, रत्नागिरी पक्ष निरीक्षक दर्शना बाबर-देसाई, काका कुडाळकर, सावंतवाडी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, असिफ शेख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.