पर्यटनस्थळांवर अपुऱ्या सोयी सुविधा

By admin | Published: February 18, 2015 09:58 PM2015-02-18T21:58:21+5:302015-02-18T23:57:38+5:30

निधी उपलब्ध करावा,,,या तालुक्याची राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे

Inadequate Facilities Facilities for Tourism | पर्यटनस्थळांवर अपुऱ्या सोयी सुविधा

पर्यटनस्थळांवर अपुऱ्या सोयी सुविधा

Next

दोडामार्ग : तालुक्यातील निसर्गसौंदर्याने नटलेला तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा व तिलारी धरण या दोन्ही पर्यटन स्थळांवर गेल्या महिनाभरापासून पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यातीलच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरील, विशेषत: गोवा राज्यात येणारे देशी -विदेशी पर्यटकही या दोन्ही पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत. मात्र, त्या ठिकाणी आता पर्यटनस्थळांवर अपुऱ्या पर्यटन सुविधांमुळे पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत आहे. शिवाय ही दोन्ही ठिकाणे देखभालीअभावी आता भकास होण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यातील पर्यटनवाढीसाठी पर्यटन स्थळांच्या विकासाबरोबरच पर्यटन सुविधा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक बनले आहे. तिलारी प्रकल्पांतर्गत साकारलेला तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा व गोवा व महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने तिलारी येथे साकारलेले कोकणातील सर्वांत मोठे मातीचे धरण ही दोन्ही पर्यटन स्थळे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. पर्यटकांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांच्या सहली, वनभोजने येथे गेल्या दोन-तीन वर्षांत मोठ्या प्रमाणावर येऊ लागली आहेत. दोडामार्ग तालुक्यालगतच गोवा राज्यात येणारे देशी-विदेशी पर्यटकही तिलारी येथील या पर्यटनस्थळांवर पर्यटनासाठी येऊ लागल्याने दोडामार्ग तालुक्यातील पर्यटकांची नांदीच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र, या पर्यटनस्थळांवर जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था, निवासाची सोय, स्वच्छतागृहे, चहापानाची-जेवणाची सोय, आदी पर्यटकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा पर्यटनस्थळांवर नसल्याने त्या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. जर तालुक्यातील पर्यटन वृद्धिंगत व्हायला हवे, तर उपरोक्त सोयी-सुविधा पर्यटनस्थळी उपलब्ध असणे आवश्यक आहे. या पर्यटनस्थळांवर जाणारे रस्ते सुलभ होण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जर पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या, तर तालुक्यातील पर्यटन वृद्धिंगत होण्यास वेळ लागणार नाही. तालुक्यातील तिलारी धरण व तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. त्यामुळे प्रथमत: या दोन पर्यटन स्थळांचा प्राधान्याने विकास होणे आवश्यक आहे. तिलारी प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तिलारी प्रकल्पाकडूनही विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. तिलारी धरणाला मुबलक पाणीसाठा, सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा व धरणाच्या बुडीत क्षेत्रात असणारे रानटी हत्तींचे वास्तव्य यामुळे या दोन्ही पर्यटन स्थळांना अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. हत्तींच्या वास्तव्याने महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभर तिलारी धरण पर्यटनस्थळाचे नाव पोहोचले आहे. तर निसर्गसौंदर्याने नटलेल्या तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्यासाठी असलेला मुबलक पाणीसाठा, सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या, सुंदर बगीचा, लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य व महाराष्ट्रातील सर्वात छोट्या अवघ्या दोन मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प असल्याने या ठिकाणी एकदा येणारा पर्यटकही येथील सौंदर्याच्या मोहात पडल्याशिवाय राहत नाही. दिवसेंदिवस या दोन्ही पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढत आहे. दरम्यान, दोडामार्ग तालुक्यातील नावारूपास आलेल्या या दोन्ही पर्यटनस्थळांबरोबरच दोडामार्गचे श्रद्धास्थान असलेल्या कसईनाथ डोंगर, तेरवण-मेढे येथील नागनाथ तीर्थक्षेत्र, शिरवल धरण, तळकटची वनबाग, सासोली येथील निसर्गनिर्मित धबधबा, अलीकडेच सासोली सड्यावर आढळलेली भुरूपे-विवरे, उसप येथील पॅराग्लायडिंगसाठी उपयोग होणारा बोकारावाडी डोंगर, मांगेली याबरोबरच फुकेरी हनुमंतगड, सिंधुदुर्ग-कोल्हापूर सीमेवर वसलेला पारगड किल्ला, आदी पर्यटन स्थळांचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. विशेषत: तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी तालुक्याच्या पर्यटन विकासाकडे शासनाचे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे.


पर्यटनस्थळांबरोबरच दोडामार्गचे श्रद्धास्थान असलेल्या कसईनाथ डोंगर, तेरवण-मेढे येथील नागनाथ तीर्थक्षेत्र, शिरवल धरण, तळकटची वनबाग, सासोली येथील निसर्गनिर्मित धबधबा, अलीकडेच सासोली सड्यावर आढळलेली भुरूपे-विवरे, उसप येथील पॅराग्लायडिंगसाठी उपयोग होणारा बोकारावाडी डोंगर, मांगेली याबरोबरच फुकेरी हनुमंतगड प्रेक्षणीय आहेत.


निधी उपलब्ध करावा
पर्यटन जिल्हा म्हणून निवड झालेल्या सिंधुदुर्गमधील दोडामार्ग
या तालुक्याची राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे
यांच्या प्रयत्नातून निर्मिती झाली. याच दोडामार्ग तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनाने गांभीर्याने लक्ष
दिल्यास दोडामार्गमधील पर्यटन वृद्धिंगत होण्यास वेळ लागणार नाही.

Web Title: Inadequate Facilities Facilities for Tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.