निवजे येथे सिंधुदुर्गातील पहिल्या भात खरेदी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 08:57 PM2020-11-18T20:57:51+5:302020-11-18T20:58:53+5:30

गेल्या दहा वर्षांत प्रथमच एवढ्या लवकर नोव्हेंबर महिन्यात भात खरेदीचा शुभारंभ होत आहे. चांदा ते बांदा योजना व कृषी यांत्रिकीकरण योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला असून शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाद्वारे श्री पद्धतीने मोठ्या प्रमाणात भात लागवड केली. त्यामुळे भाताचे उत्पादन वाढले आहे. भात खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.

Inauguration of the first paddy shopping center at Sindhudurg at Nivje | निवजे येथे सिंधुदुर्गातील पहिल्या भात खरेदी केंद्राचा शुभारंभ

भात खरेदीचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांनी केला. यावेळी नागेंद्र परब, नामदेव गवळी, राजू कविटकर, जयभारत पालव, श्रेया परब, बाळू पालव, संदीप चव्हाण, निलेश उगवेकर, प्रभाकर वारंग उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देनिवजे येथे सिंधुदुर्गातील पहिल्या भात खरेदी केंद्राचा शुभारंभ यावर्षी ६० हजार क्विंटल भात खरेदीचा संकल्प  : वैभव नाईक

कुडाळ : गेल्या दहा वर्षांत प्रथमच एवढ्या लवकर नोव्हेंबर महिन्यात भात खरेदीचा शुभारंभ होत आहे. चांदा ते बांदा योजना व कृषी यांत्रिकीकरण योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला असून शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाद्वारे श्री पद्धतीने मोठ्या प्रमाणात भात लागवड केली. त्यामुळे भाताचे उत्पादन वाढले आहे. भात खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीच्या नुकसानीची रक्कम राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा होईल. तसेच कृषीविषयक इतर योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यात येईल. त्याचप्रमाणे यावर्षी उच्चांकी भात खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गतवर्षी शासनामार्फत ३६ हजार क्विंटल भात खरेदी करण्यात आली. मात्र, यावर्षी ६०हजार क्विंटल भात खरेदी करण्याचा संकल्प आहे, असेही आमदार नाईक यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई यांच्यावतीने बजाज सिंधुदुर्ग राईस मिल अंतर्गत कुडाळ तालुक्यातील निवजे येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी नामदेव गवळी, जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, कुडाळ पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव, सदस्या श्रेया परब, उपतालुकाप्रमुख बाळू पालव, बजाज राईस मिलचे मॅनेजर संदीप चव्हाण, कृषी पर्यवेक्षक निलेश उगवेकर, प्रभाकर वारंग, निवजे सोसायटीचे चेअरमन सूर्यकांत सावंत, शाखाप्रमुख संतोष पिंगुळकर, शेतकरी महादेव पालव, दत्ता सावंत, सीताराम पालव, श्याम पिंगुळकर सुधीर राऊळ आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्यातील निवजे या ग्रामीण भागातील सोसायटीमध्ये प्रथम भात खरेदीचा शुभारंभ केला त्याबद्दल नागेंद्र परब यांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.

हमीभावात वाढ केली

भात खरेदीसाठी जिल्ह्यात ४२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. गतवर्षी शेतकऱ्यांना क्विंटलमागे १८१५ रुपये हमीभाव देण्यात आला होता. तसेच त्यावर ७०० रुपये बोनस मिळून २५१५ रुपये दर देण्यात आला होता. यावर्षी शासनाने हमीभावात ५३ रुपयांची वाढ केली असून १८६८ रुहमीभाव लागू करण्यात आला आहे, असे आमदार नाईक म्हणाले.

 

Web Title: Inauguration of the first paddy shopping center at Sindhudurg at Nivje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.