कुडाळ येथे जिल्ह्यातील पहिल्या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 06:21 PM2021-02-16T18:21:27+5:302021-02-16T18:23:49+5:30
Selfie Kudal Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे प्रथमच भव्य-दिव्य स्वरूपात सेल्फी पॉईंट साकारण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी पॉईंटचा शुभारंभ कुडाळच्या ज्येष्ठ नागरिक शालिनी म्हाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आला.
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे प्रथमच भव्य-दिव्य स्वरूपात सेल्फी पॉईंट साकारण्यात आला आहे. आता येत्या महिन्यात कुडाळ येथील गांधी चौकाचेही सुशोभिकरण करण्यात येईल, असे प्रतिपादन कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सेल्फी पॉईंटच्या शुभारंभीप्रसंगी केले. आकर्षक सेल्फी पॉईंटचा शुभारंभ कुडाळच्या ज्येष्ठ नागरिक शालिनी म्हाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आला.
कुडाळ शहरात बस स्टँडसमोर कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली व कुडाळ नगरपंचायतीचे सर्व लोकप्रतिनिधी यांच्या व नगरपंचायतीच्यावतीने बांधण्यात आलेल्या आकर्षक ह्यसेल्फी पॉईंटह्णचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी कुडाळ येथील ज्येष्ठ नागरिक शालिनी म्हाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्यासह उपनगराध्यक्षा सायली मांजरेकर, नगरसेवक सुनील बांदेकर, अनंत उर्फ आबा धडाम, नगरसेवक सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर, जीवन बांदेकर, एजाज नाईक, राकेश कांदे, नगरसेविका उषा आठले, सरोज जाधव, मेधा सुकी, साक्षी सावंत, प्रज्ञा राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट, राकेश नेमळेकर, प्राची आठले, चंदन कांबळी, अनिष सावंत, गोट्या सावंत, निलेश शिरसाट, प्रकाश कोरगावकर, निलेश मांजरेकर तसेच कुडाळ नगरपंचायत कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि कुडाळवासीय उपस्थित होते.
यावेळी या सेल्फी पॉईंटचे डिझाइन करणारे कोरगावकर तसेच नगरपंचायतीचे इंजिनिअर यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश कांदे यांनी केले.
शहराची ओळख सेल्फी पॉईंटने होते
यावेळी तेली म्हणाले, आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो त्या शहराची ओळख नव्या युगात ही सेल्फी पॉईंटने होते. त्याच विचारातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे प्रथमच भव्य दिव्य स्वरूपात सेल्फी पॉईंट साकारण्यात आला आहे. आता कुडाळ शहरातील गांधी चौकाचेही सुशोभिकरण एका महिन्यात करण्यात येणार आहे.