कोकिसरेतील युवासेनेच्या मेळाव्यात सभासद नोंदणीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 02:51 PM2020-12-08T14:51:14+5:302020-12-08T14:53:03+5:30
Shivsena, Viabhawadi, Sindhudurgnews शासनाच्या योजना गावागावातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचविणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे संघटना मजबूत करण्यासाठी गाव तेथे युवा सेना शाखा निर्माण केल्या जातील, असे प्रतिपादन युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम यांनी येथे केले.
वैभववाडी : भविष्यातील राजकारणात तरुणांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जनहिताच्या योजना राबवित आहे. त्यामुळे शासनाच्या योजना गावागावातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचविणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे संघटना मजबूत करण्यासाठी गाव तेथे युवा सेना शाखा निर्माण केल्या जातील, असे प्रतिपादन युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम यांनी येथे केले.
कोकिसरेतील श्री माधवराव पवार विद्यालयाच्या सभागृहात युवासेनेचा मेळावा झाला. या मेळाव्याला विस्तारक अमित पेडणेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू, राजू राठोड, जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, अतुल सरवटे, रोहित पावसकर, जयराज हरयाण, सागर मेजारी, तुषार शिंदे, सिध्देश कडू, विक्रांत पवार, वैभव सुतार, सुशांत म्हसकर, योगेश गोठणकर, विठोबा गुरव आदी उपस्थित होते.
कदम पुढे म्हणाले की, पुढच्या काळात राजकारणात युवा पिढीची भूमिका खूपच महत्त्वाची राहणार आहे. जबाबदार लोकप्रतिनिधी युवा पिढीतून तयार होणार आहेत. त्यामुळे तरुणांनी राजकारणासोबत सामाजिक कार्यासाठी पुढे यायला हवे. युवा सेनेच्या माध्यमातून राज्यात सध्या बूथ तेथे युथ हे अभियान राबविले जात आहे.
तालुक्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वैभववाडी महाविद्यालयात युवासेना युनिटची स्थापना करण्यात आली आहे. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी येत्या काळात राज्य सरकारच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.