सिंधुदुर्ग पोलिस मुख्यालयात सायबर पोलिस ठाण्याचे उद्धाटन, आयजींकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 24, 2023 03:48 PM2023-03-24T15:48:30+5:302023-03-24T15:49:37+5:30

सिंधुदुर्ग : कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण पवार यांच्या हस्ते येथील पोलिस मुख्यालयात शुक्रवारी सायबर पोलिस ठाण्याचे उद्घाटन ...

Inauguration of Cyber Police Station at Sindhudurg Police Headquarters, Staff Appreciated by IG | सिंधुदुर्ग पोलिस मुख्यालयात सायबर पोलिस ठाण्याचे उद्धाटन, आयजींकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक 

सिंधुदुर्ग पोलिस मुख्यालयात सायबर पोलिस ठाण्याचे उद्धाटन, आयजींकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक 

googlenewsNext

सिंधुदुर्ग : कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण पवार यांच्या हस्ते येथील पोलिस मुख्यालयात शुक्रवारी सायबर पोलिस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पवार यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांची चौकशी करुन त्यांचे कौतुक तर केलेच शिवाय त्यांच्या कामगिरी बद्दल समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले, पोलिस निरीक्षक अमित यादव, सायबर पोलिस ठाण्याचे स.पो.नि.बळीराम सुतार यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सुरुवातीला विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण पवार यांच्या हस्ते कोनाशिला अनावरण करण्यात आले. त्यानंतर फित कापून पोलिस ठाण्याचे उद्घाटन झाले. पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी यावेळी माहिती दिली. 

परब, तोरसकर यांच्या ज्ञानाचा पोलिस दलाला फायदा

आयजी पवार यांनी सायबर पोलिस ठाण्याची पाहणी करत उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यावेळी येथील धनश्री परब या बी.ए.,डी.एड., एल.एल.बी. तर स्वप्नील तोरसकर हा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक, एल.एल.बी. झाल्याचे सांगितले. यावर आयजींनी या दोघांच्या ज्ञानाचा पोलिस दलास निश्चित फायदा होईल. पोलिस दलात अनेक उच्च शिक्षण घेतलेले कर्मचारी आहेत. विशेषत: घर सांभाळून महिला कर्मचारी आपले शिक्षण घेतात. अशा पोलिस दलाचा निश्चितच अभिमान आहे. याचा फायदा गुन्ह्याची उकल करताना होणार आहे. अशा शब्दात कौतुक करुन शुभेच्छा व्यक्त केल्या.

सायबर पोलिस ठाण्याचे स.पो.नि. बळीराम सुतार यांनी सायबर पोलिस ठाणे निर्माण करण्याचा हेतू विषद करुन जिल्ह्यातील सायबर गुन्हांच्या तपासाचा आढावा सादर केला.

Web Title: Inauguration of Cyber Police Station at Sindhudurg Police Headquarters, Staff Appreciated by IG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.