दुग्ध व्यवसायासाठी माडखोल येथे प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ, ९ रोजी होणार उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 11:59 AM2021-01-04T11:59:22+5:302021-01-04T12:04:38+5:30

Milk Supply Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पुढाकाराने दुग्ध, कुक्कुटपालन व शेळीपालन व्यवसायासाठी सावंतवाडी माडखोल येथे कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र सुरू करून जिल्ह्यात व्यवसाय यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Inauguration of training center for dairy business at Madkhol on 9th | दुग्ध व्यवसायासाठी माडखोल येथे प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ, ९ रोजी होणार उद्घाटन

दुग्ध व्यवसायासाठी माडखोल येथे प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ, ९ रोजी होणार उद्घाटन

googlenewsNext
ठळक मुद्दे दुग्ध व्यवसायासाठी माडखोल येथे प्रशिक्षण केंद्राचा ९ रोजी उद्घाटन कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र  : सतीश सावंत

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पुढाकाराने दुग्ध, कुक्कुटपालन व शेळीपालन व्यवसायासाठी सावंतवाडी माडखोल येथे कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र सुरू करून जिल्ह्यात व्यवसाय यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

येत्या ९ जानेवारी रोजी माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते माडखोल येथे समृध्दी दुग्धविकास केंद्राचा शुभारंभ करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ प्रसाद देवधर, समृध्दी दुग्धविकास केंद्राचे प्रभाकर देसाई, बँकेचे प्रमोद गावडे आदी उपस्थित होते.

माडखोल येथे समृद्धी दुग्ध विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्यासाठी इच्छुक असलेल्या नवोदितांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहीती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. हे केंद्र सावंतवाडी येथील उद्योजक प्रभाकर देसाई यांच्या माडखोल येथील फार्महाऊसवर होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक, देसाई डेअरी फार्म व भगीरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. कोणत्याही व्यवसायामध्ये शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्यास प्रकल्प यशस्वी होतो. नवीन तरुणांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय हा व्यावसायिक पद्धतीने करावयाचा आहे त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण केंद्र सुवर्णसंधी ठरणार आहे.

दुग्ध व्यवसायातील अडचणी दूर होण्यास मदत

येत्या ९ जानेवारीला आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन होणार आहे, असे सावंत यांनी सांगितले. सावंत म्हणाले, जिल्हा बँकेच्या माध्यमातून हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यात १५ लोकांना एकदिवसीय, तर ५० लोकांना तीन दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या माध्यमातून दुग्ध व्यवसायात निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. त्याच बरोबर कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल, या दृष्टीने त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Web Title: Inauguration of training center for dairy business at Madkhol on 9th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.