असगणीत सार्वजनिक विहीर कोसळली, संततधार पावसामुळे मालवणमध्ये पडझडीच्या घटना
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 7, 2023 11:41 AM2023-07-07T11:41:13+5:302023-07-07T11:41:36+5:30
मुसळधार पावसामुळे शहरासह काही गावात पडझड तसेच वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत
मालवण (सिंधुदुर्ग) : गेले चार दिवस मालवणात कोसळणाऱ्या पावसाचा जोर शुक्रवारी कायम आहे. त्यासोबत वाऱ्यांचा जोरही वाढला. मुसळधार पावसामुळे शहरासह काही गावात पडझड तसेच वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत. असगणी येथील सार्वजनिक पाण्याची विहीर कोसळली आहे.
शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यात दांडी किनारपट्टी मोरेश्वरवाडी येथील स्मशानभूमी वरील पत्र्याची शेड व काही बांधकाम उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
असगणी येथील ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर कोसळून ४ लाख रुपयांचे नुकसान झाले. ओवळीये येथील अंकुश विष्णू गुळेकर यांच्या घरावर झाड पडून भिंत कोसळल्याने सुमारे ३३ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती मालवण तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.