सावंतवाडी तालुक्यात कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 02:50 PM2020-05-31T14:50:53+5:302020-05-31T14:52:04+5:30
दिवसभरात जिल्हा रुग्णालयात प्राप्त झालेल्या अहवालात सावंतवाडी तालुक्यातील बांदा, डेगवे, असनिये व माडखोल येथील चार जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावठणवाडी येथील शाळेत विलगीकरण कक्षात असलेले दोघेजण गुरुवारी कोरोनाबाधित झाल्यानंतर शुक्रवारी या संख्येत अधिकच भर पडली. दिवसभरात जिल्हा रुग्णालयात प्राप्त झालेल्या अहवालात सावंतवाडी तालुक्यातील बांदा, डेगवे असनिये व माडखोल येथील चार जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हे सर्व भाग कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत.
सावंतवाडी तालुका गेले दोन महिने कोरोनामुक्त होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सावंतवाडी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तालुकावासीयांची धाकधूक वाढली आहे. कारिवडे गावठणवाडी येथील शाळेत विलगीकरण कक्षात असलेले दोघेजण गुरुवारी कोरोनाबाधित मिळाल्यानंतर शुक्रवारी या संख्येत अधिकच भर पडली.
दिवसभरात जिल्हा रुग्णालयात प्राप्त झालेल्या अहवालात सावंतवाडी तालुक्यातील बांदा, डेगवे, असनिये व माडखोल येथील चार जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
त्यामुळे कोरोना रुग्ण मिळालेले परिसर आता प्रशासनाने कंटेन्मेंट झोन केले आहेत. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी या परिसरांची पाहणी केली आहे. त्यानंतर हे परिसर कंटेन्मेंट झोन करीत पोलिसांना तशा सूचनाही दिल्या आहेत.