सशस्त्र दलात महिलांची संख्या वाढवणार; पंतप्रधान मोदींनी नौदल दिनाच्या कार्यक्रमात घोषणा केली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 08:52 PM2023-12-04T20:52:41+5:302023-12-04T20:55:28+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित नौदल दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सशस्त्र दलात महिलांची संख्या वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित नौदल दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मोदी म्हणाले, 'आम्ही सशस्त्र दलांमध्ये महिलांची संख्या वाढवण्यावर भर देत आहोत.' 'आज भारत स्वत:साठी मोठी उद्दिष्टे ठरवत आहे आणि ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपली पूर्ण क्षमता वापरत आहे.'
"नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा", पंतप्रधान मोदींकडून दोन मोठ्या घोषणा
बंदरावर आधारित विकासाला भारत अभूतपूर्व पाठिंबा देत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले, ‘व्यापारी शिपिंगलाही प्रोत्साहन दिले जात आहे. भारत समुद्रातील क्षमता वापरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.भारतीय नौदलातील पदांची नावे भारतीय संस्कृतीनुसार बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नौदल दिनाच्या कार्यक्रमापूर्वी मोदींनी जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर तारकर्ली समुद्रकिनारी भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांचे ऑपरेशनल प्रदर्शन मोदींनी पाहिले.
मोदींनी दोन मोठ्या घोषणा केल्या
पीएम मोदी म्हणाले, भारताने आज गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. नौसेनेच्या ध्वजाला मागच्या वर्षी महाराजांच्या विचारांशी जोडता आलं, हे माझं भाग्य आहे. आता नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल आणि नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावं देणार असल्याची घोषणा पीएम मोदींनी यावेळी केली.