लम्पी आजाराचा जनावरांना वाढला धोका, पशुपालकांनो काळजी घ्या

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 14, 2022 12:06 PM2022-09-14T12:06:52+5:302022-09-14T12:07:14+5:30

हा आजार साधारणपणे दोन तीन आठवड्याांत बरा होवू शकतो.

Increased risk of Lumpy disease to animals | लम्पी आजाराचा जनावरांना वाढला धोका, पशुपालकांनो काळजी घ्या

लम्पी आजाराचा जनावरांना वाढला धोका, पशुपालकांनो काळजी घ्या

googlenewsNext

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जनावरांमध्ये लम्पी स्कीन डिसिजचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. पशुपालकांनी मुळीच घाबरून न जाता लम्पी स्कीन रोगाने सकारात्मक निदान करण्याकरीता पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून आजारी जनावरांवर औषधोपचरा करून घ्यावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राने केले आहे.

लम्पी स्कीन रोग हा त्वचा रोग असून तो विषाणूजन्य व साथीचा आजार आहे. हा रोग प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना अर्थात गाई, बैल, वासरे यांच्यात आढळून येतो. हा आजार माणसांना होत नाही. हा विषाणू मेढ्यांमध्ये होणार्या देवीच्या विषाणूशी साधर्म्य असणारा असून सर्वसाधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. हा आजार साधारणपणे दोन तीन आठवड्याांत बरा होवू शकतो.

लम्पी त्वचा रोग म्हणजे काय ?

  • लम्पी त्वचारोग हा विषाणूपासून होणार संसर्गजन्य रोग आहे. पॉक्सीविरिडे जातीमधील कॅप्रिपॉक्स विषाणूमुळे रोग होतो.
  • या रोगाचा प्रसार डास, गोमाशी आणि गोचिड यांच्याव्दारे होतो. तसेच बाधित जनावरांच्या संपर्कात निरोगी जनावरे आल्यामुळेदेखील होतो.


काय आहेत लक्षणे

  • दोन ते तीन दिवसांसाठी मध्यम तिव्रतेचा ताप आणि त्यानंतर शरीरावीर सर्वत्र कडक घट्ट गोलाकार फोडी येतात. या फोडीच्या कडा घट्ट आणि दर आलेल्या दिसतात.
  • यामध्ये वरची त्वचा आतील कातडे आणि स्नायूंचा भागदेखील चिकटलेला आढळतो. काही कालावधीनंतर हे फोड काळे पडतात व त्यावर खपली तयार होते.
  • ही खपली निधून गेली तर एक रूपयांच्या नाण्याप्रमाणे गोल खड्डा होतो आणि आत गुलाबी किवा लाल रंगाची त्वचा दिसू लागते.
  • याशिवाय जनावरांचे वजन कमी होणे, अशक्तपणा येणे, चारा न खाणे, लसिका ग्रंथींमध्ये सूज येणे, पायाला सूज येणे, पोळाला सूज येणे, दूध उत्पादनात कमी होणे, गाभडणे, जनावरांमध्ये वंध्यत्व येणे आणि थोड्या प्रमाणात मरतूक होणे, अशी लक्षणे आढळून येतात.


नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय

  • लक्षणे दिसताच जनावरांना इतर निरोगी जनावरांमध्ये मिसळू देवू नये. आजारी जनावरे सार्वजनिक कुरणामध्ये चरण्यासाठी घेऊन जावू नये किवा जे रोगी जनावरे आहेत त्यांना आजारी जनावरांपासून तातडीने वेगळे करावे. आजारी जनावरांच्याजवळ खाद्य पाणी करू नये.
  • गोठ्यामध्ये व निरोगी जनावरांवरती कीटकनाशके फवारणी करणे, लक्षणे आढळलेल्या गावांमधून इतर जनारांची वाहतूक, बाजार आणि इतर दळणवळण बंद करावे. आजारामुळे दगावलेल्या जनावरांना खोल खड्डा करून पुरून घ्यावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Increased risk of Lumpy disease to animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.