गोवा पोलिसांचा बंदोबस्त का वाढविला जाणून घ्या...पूर्ण खबरदारी घेणे आता अत्यावश्यक बनले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 05:28 PM2020-04-28T17:28:42+5:302020-04-28T17:29:50+5:30

एका वाहनासाठी सुमारे अर्धा तास लागत असल्याने सीमेवर वाहनांची एक किलोमीटरपर्यंत रांग लागली आहे. तपासणीसाठी साधारणपणे बराच कालावधी गेल्यास नाशवंत वस्तूंच्या नुकसानीस जबाबदार कोण? असा सवाल वाहनधारकांनी उपस्थित केला.

Increased security of Goa Police at Patradevi Naka | गोवा पोलिसांचा बंदोबस्त का वाढविला जाणून घ्या...पूर्ण खबरदारी घेणे आता अत्यावश्यक बनले

गोवा पोलिसांचा बंदोबस्त का वाढविला जाणून घ्या...पूर्ण खबरदारी घेणे आता अत्यावश्यक बनले

Next

बांदा : गोवा सरकारकडून कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी गोव्यात येणाऱ्यांची कडक आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी सर्व सीमांवरील बंदोबस्त पूर्वीपेक्षा अधिक वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्र - गोवा सीमेवर बांदा-पत्रादेवी तपासणी नाक्यावर गोव्यात जाणा-या वाहनांची कसून तपासणी सुरू असून हे चेकपोस्ट आता सीमेच्या अगदी जवळ एक्साईज नाक्यानजीक नेण्यात आले आहे.

अत्यावश्यक सेवा पुरविणा-या वाहनांच्या कागदपत्रांसह चालक व क्लीनरची आरोग्यविषयक तपासणी केल्यानंतरच गोव्यात प्रवेश दिला जात आहे. एका वाहनासाठी सुमारे अर्धा तास लागत असल्याने सीमेवर वाहनांची एक किलोमीटरपर्यंत रांग लागली आहे. तपासणीसाठी साधारणपणे बराच कालावधी गेल्यास नाशवंत वस्तूंच्या नुकसानीस जबाबदार कोण? असा सवाल वाहनधारकांनी उपस्थित केला. मात्र, गोवा पोलिसांनी सरकारकडून मिळालेल्या निर्देशानुसार तपासणी होत असल्याचे स्पष्ट केले.

गोवा हे देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य झाले असून भविष्याचा विचार करून सरकारने गोव्यात येणाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी अधिकारी व कर्मचारी अत्यंत दक्षतेने कडक तपासणी करीत आहेत.

सर्व सीमांवरील पोलीस बंदोबस्त पूर्वीपेक्षा अधिक वाढविण्यात आला आहे, अशी माहिती पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिली. या ठिकाणी गोवा तपासणी नाक्यावर गोव्यात येणाºया व गोव्यातून बाहेर जाणाºया वाहनांसाठी दोन स्वतंत्र तपासणी कक्ष उभारण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त गोवा सरकारकडून या तपासणी नाक्यासाठी विशेष तपासणी कक्षही प्राप्त झाला असून तो तातडीने कार्यान्वित होणार आहे.

अत्यावश्यक सेवा पुरविणाया वाहनांच्या कागदपत्रांसह चालक व क्लीनरची आरोग्यविषयक तपासणी केल्यानंतरच गोव्यात प्रवेश दिला जात आहे. यासाठी बराच वेळ लागत असल्याने सीमेवर बांदा सटमटवाडी येथील महाराष्ट्र हद्दीत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेणे अत्यावश्यक गोवा-महाराष्ट्र सीमेवर गोवा व महाराष्ट्र राज्याचे तपासणी नाके आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या तपासणी नाक्यावरसुद्धा कडक बंदोबस्त असून पोलिसांकडून वाहनांची तसेच आरोग्य पथकाकडून येणा-या चालक व क्लीनरची कडक तपासणी होत आहे.

आता केवळ अत्यावश्यक सेवा, मालवाहक गाड्यांची वाहतूक तसेच रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवा आदी सुरू आहेत. तपासणीमुळे वाहनचालकांच्या रांगा सीमेवर तासनतास उभ्या राहत आहेत. मात्र, सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेणे आता अत्यावश्यक बनले आहे.


सोमवारी दुपारच्या सुमारास गोवा पोलिसांनी महाराष्ट्राच्या हद्दीत एक किलोमीटर अंतरावर तपासणीसाठी थांबविलेली मालवाहतूक वाहनांची रांग सटमटवाडी रस्त्यापर्यंत पोहोचली होती. तर दुसºया छायाचित्रात पत्रादेवी येथे गोव्यात येणाºया व बाहेर जाणाºया वाहनांच्या तपासणीसाठी उभारलेला स्वतंत्र कक्ष दिसत आहे.

 

Web Title: Increased security of Goa Police at Patradevi Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.