निवती ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 06:26 PM2020-12-30T18:26:23+5:302020-12-30T18:27:41+5:30

road transport Sindhudurg- अर्धवट सोडलेल्या व खड्डेमय असलेल्या म्हापण-निवती रस्त्याचे काम तत्काळ सुरू करा, या मागणीसाठी निवती ग्रामस्थांनी कुडाळ येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. रात्री उशिरापर्यंत कोणताच निर्णय न झाल्याने हे उपोषण चिघळण्याची शक्यता आहे.

Indefinite fast of Nivati villagers started | निवती ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू

निवती ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू

Next
ठळक मुद्देनिवती ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरूम्हापण-निवती रस्त्याचे काम तत्काळ सुरू करा

कुडाळ : अर्धवट सोडलेल्या व खड्डेमय असलेल्या म्हापण-निवती रस्त्याचे काम तत्काळ सुरू करा, या मागणीसाठी निवती ग्रामस्थांनी कुडाळ येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. रात्री उशिरापर्यंत कोणताच निर्णय न झाल्याने हे उपोषण चिघळण्याची शक्यता आहे.

निवती रस्त्याचे अर्ध्यावर सोडलेले काम सुरू करा. ठेकेदार काम करत नाही, संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, असे सांगत मंगळवारी निवती येथील १०० ते १५० ग्रामस्थांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता यांच्या कुडाळ येथील मुख्य कार्यालयात उपोषण सुरू केले आहे. निवती ग्रामस्थांनी मागील आठ दिवसांपूर्वी उपोषणाचा इशारा दिला होता; परंतु याकडे ठेकेदार व अधिकारी यांनी लक्ष न आम्ही निवती ग्रामस्थ उपोषणाला बसलो आहोत. गावातील बऱ्याच लोकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून या उपोषणाला सहभाग घेतला आहे, असे निवती ग्रामस्थांनी सांगितले.

उपोषणस्थळी कार्यकारी अभियंता ए. जे. पाटील, शाखा अभियंता मेस्त्री यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत तोडगा निघाला नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कुडाळ कार्यालयासमोर पोलीस, होमगार्ड तैनात ठेवले आहेत.

निवती रस्त्याचे बंद अवस्थेतील काम सुरू करा, अन्यथा आमरण उपोषणाला बसणार, असा इशारा निवती येथील ग्रामस्थांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या जिल्हा कार्यालयाला भेट देत २१ डिसेंबर रोजी कुडाळ येथील मुख्य कार्यकारी अभियंता ए. जे. पाटील यांना दिला होता. निवेदन देऊन काम बंद असलेल्या रस्त्यासंदर्भात चर्चा केली होती. मात्र, या चर्चेदरम्यान कोणतेही काम संबंधित ठेकेदाराने सुरू न केल्याने मंगळवारी निवती ग्रामस्थांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कुडाळ येथील जिल्हा कार्यालयावर मोर्चा काढत उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणाला प्रामुख्याने किशोर सारंग, तृप्ती कांबळी, विलास आरोलकर, लक्ष्मण नाईक, उदय सारंग, सुरेश पडते, कांचन पाटकर, अनिल मेतर, वीरश्री मेतर, निलेश वस्त, नागेश सारंग, भारती धुरी, अजित खवणेकर, सुधीर मेतर, रामचंद्र भगत, नमिता घाटवळ हे सर्व निवती ग्रामस्थ, व अन्य ग्रामस्थ कुडाळ येथील पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यालयासमोर हजर होते.


प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयासमोर निवतीवासीयांनी बेमुदत उपोषण छेडले.

Web Title: Indefinite fast of Nivati villagers started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.