वन्यजीवांची माहिती होणार कॅमेराबद्ध

By admin | Published: December 20, 2014 11:24 PM2014-12-20T23:24:02+5:302014-12-20T23:24:02+5:30

तीन शाळांची निवड : आंबोलीतील विद्यार्थ्यांकडून प्रकल्पास सुरुवात

Information about wildlife will be cameraman | वन्यजीवांची माहिती होणार कॅमेराबद्ध

वन्यजीवांची माहिती होणार कॅमेराबद्ध

Next

आंबोली : भारत, मॅक्सिको व अमेरिका या तीन देशांमध्ये वन्यजीवांविषयी जनमानसात जागृती, आवड निर्माण व्हावी म्हणून अमेरिका व मॅक्सिकन प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या तिन्ही देशांमध्ये प्रथमत: सस्तन प्राण्यांविषयी माहिती शाळकरी मुलांकडून स्वयंचलित कॅमेरा (कॅमेरा ट्रॅप) या माध्यमातून संकलित करण्यासाठी भारतातील तीन शाळांची निवड करण्यात आली आहे. या अनुषंगाने आंबोलीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
यात आंबोलीतील युनियन इंग्लिश स्कूल आंबोली, राजापूर येथील अणसुरे विद्यालय, नागपूर रामटेकमधील जनसेवा हायस्कूल पवनी यांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या शुभारंभप्रसंगी तिन्ही शाळांचे शिक्षक प्रतिनिधी तसेच या प्रकल्पाचे मुख्य समन्वयक तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक तथा संशोधक राहूल खोत, संजय करकरे, आंबोली शाळेचे मुख्याध्यापक विनायक खानोलकर, अभ्यासक हेमंत ओगले, प्रसाद गावडे, संजय मांडवकर, संजय धोटे, पुणे येथील पर्यावरण अभ्यासक साईली पालांडे- दातार, काका भिसे, शुभम आळवे, या प्रकल्पाच्या मुख्य संयोजिका ज्या अमेरिका येथून या कार्यशाळेत मार्गदर्शन व कॅमेरा ट्रॅप लावणे व त्यांचे निरीक्षण व नोंदी लिहिणे या सर्वांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे यासाठी आलेल्या स्टेफनी शेटलर, आंबोली वनक्षेत्रपाल ए. बी. तेअरे, डॉ. अंकुर पटवर्धन हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी आपली मते मांडली व प्रकल्पाच्या पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. तीन दिवस चाललेल्या कार्यशाळेत स्वयंचलीत कॅमेरे जंगलात लावावे. या कॅमेऱ्याच्या समोरून कोणताही प्राणी गेल्यास तो कॅमेरा कसा फोटो काढतो, काढलेला फोटो कसा तपासणे, त्याची नोंद कशी करणे या विषयी मार्गदर्शन कार्यशाळेत करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Information about wildlife will be cameraman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.