सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्याय खपवून घेणार नाही, सावंतवाडीत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:09 PM2021-03-18T16:09:28+5:302021-03-18T16:12:06+5:30

Sawantwadi Karnatak sindhudurg kolhapur- बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांवर कन्नड लोकांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात येथील शिवाजी चौकात महाराष्ट्र एकीकरण समिती, सिंधुदुर्गच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठी भाषिकांवर होणारा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. याठिकाणी उदरनिर्वाह करणाऱ्या कन्नड लोकांच्या पोटावर पाय आणायचा असेल, तरच त्यांनी असे कृत्य करावे, असा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी दिला. केसरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

Injustice against Marathi speakers in the border areas will not be tolerated, dam in Sawantwadi | सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्याय खपवून घेणार नाही, सावंतवाडीत धरणे

सावंतवाडीत महाराष्ट्र एकीकरण समितीकडून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी वसंत केसरकर, बबन साळगावकर, उमाकांत वारंग, पुंडलिक दळवी आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देसीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्याय खपवून घेणार नाही :वसंत केसरकर एकीकरण समितीकडून सावंतवाडीत धरणे आंदोलन

सावंतवाडी : बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांवर कन्नड लोकांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात येथील शिवाजी चौकात महाराष्ट्र एकीकरण समिती, सिंधुदुर्गच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठी भाषिकांवर होणारा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. याठिकाणी उदरनिर्वाह करणाऱ्या कन्नड लोकांच्या पोटावर पाय आणायचा असेल, तरच त्यांनी असे कृत्य करावे, असा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी दिला. केसरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, अपर्णा कोठावळे, दर्शना बाबर-देसाई, राजू धारपवार, नगरसेविका दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, सचिन इंगळे, उमा वारंग, उदय नाईक, अफरोज राजगुरू, हिदायतुल्ला खान आदींसह मोठ्या संख्येने मराठी भाषाप्रेमी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

केसरकर म्हणाले, बेळगाव सीमा भागात सुरू असलेल्या वादात मराठी भाषिकांचा नाहक बळी जात आहे. दरम्यान, हा खटला न्यायालयात असून, त्याचा निकाल शांततेच्या मार्गाने लागत आहे. मात्र, कर्नाटकातील काही समाजकंटकांकडून कायदा हातात घेऊन रस्त्यात दंगली घडवून आणल्या जात आहेत. यात मराठी भाषिकांवर हल्ले केले जात आहेत तर महाराष्ट्रातून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिकांवरसुद्धा कन्नड समाजकंटकांकडून दगडफेक केली जात आहे. हा सर्व प्रकार निषेधार्थ आहे.

कर्नाटकातील लोक मोठ्या संख्येने महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांना याठिकाणी मराठी भाषिकांकडून कोणताही त्रास दिला जात नाही. उलट त्यांचा याठिकाणी सन्मानच केला जातो. मात्र, आपल्या भाऊबंधांच्या पोटावर पाय आणायचा असेल तर अशा कर्नाटकातील समाजकंटकांनी हे कृत्य करावे, मग आम्हीसुद्धा आमची ताकद दाखवू, असेही ते म्हणाले.

 

Web Title: Injustice against Marathi speakers in the border areas will not be tolerated, dam in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.