काजू दर ठरविताना बाजार समितीकडून अन्याय

By admin | Published: March 30, 2016 10:42 PM2016-03-30T22:42:07+5:302016-03-30T23:54:52+5:30

रूपेश खाडये : मालाच्या प्रतवारीनुसार दर ठरविण्याची मागणी, नवीन लागवड होणे गरजेचे

Injustice by the market committee for deciding cashew rates | काजू दर ठरविताना बाजार समितीकडून अन्याय

काजू दर ठरविताना बाजार समितीकडून अन्याय

Next

कणकवली : सिंधुदुर्गात बांदा, दोडामार्ग, भेडशी येथील काजू बी मोठी व दर्जेदार असते. त्याला सध्या १२० रुपये व त्याच भागातील सेंद्रिय काजू १२३ रूपये दराने घेतला जातो. तर कुडाळ, कणकवली, मालवण, वैभववाडी, देवगड या भागातील काजू बी त्या मानाने दुय्यम दर्जाची असल्याने प्रतवारीने ११० ते ११३ रुपये दराने सध्या व्यापारी ते खरेदी करत आहेत. या सर्वच मालाला प्रतवारीनुसार दर देणे संयुक्तिक असताना बाजार समितीने जाहीर केलेला ११६ रुपये दर हा बांदा, दोडामार्ग या भागातील शेतकऱ्यांवर तर कणकवली भागातील व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे. बाजार समितीने प्रतवारीच्या मालाच्या गुणवत्तेचा विचार करून दर जाहीर करणे गरजेचे आहे, असे काजू व्यापारी रूपेश खाडये यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कोणताही अभ्यास न करता समितीने हा निर्णय घेतला आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी ११६ ११६ रूपये प्रतिकिलो दर द्यावा, असे समितीने ठरवले आहे. परंतु बाजारात येत असलेली काजू बी ही वेगवेगळ्या प्रतवारीनुसार येत असते.
गेली कित्येक वर्षे आम्ही प्रतवारीनुसार दर निश्चित करून दर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. म्हणजे मोठी काजू बी सध्या १२० ते १२५ रूपयेप्रमाणे घेतली जाते. तर मध्यम आकाराची ११० ते ११५ तर बारीक काजू १०० या प्रतवारीनुसार घेतला जातो.
मात्र, बाजार समितीचे असे म्हणणे आहे की, बाजारात येणाऱ्या सर्वच मालाला ११६ रुपये दर द्यावा. कणकवलीतील शेतकऱ्यांना ११६ रूपये दर देणे बंधनकारक असले तरी हा माल व्यापाऱ्यांना ३ टक्के कमिशन, १.०५ टक्के बाजार समितीचा कर देऊन बाजार समितीने तत्काळ खरेदी करावा.
खरेदी करताना तत्काळ रोख किंवा बॅँक आरटीजीएस पेमेंट देऊन खरेदी करण्याची व्यवस्था करावी. तर व्यापारी बांधव या समितीने घेतलेल्या निर्णयाला बांधील राहतील. तसेच सिंधुदुर्ग बाजार समिती गेली १७ वर्षे कर गोळा करत आहे. तरी एकाही तालुक्यात एकही मार्केट यार्ड, गोदाम इतर सुविधा पुरवू शकलेली नाही. पणन मंडळाचा ३ टक्के दराने कर्ज पुरवठा उपलब्ध असताना तोही पुरवठा करण्याचे सौजन्य दाखवले नाही.
जगात कोणत्याही मालाला गुणवत्तेप्रमाणे दर दिला जातो. हे बाजार समितीने लक्षात घेऊन मगच दर घोषित करावा. कृषीखात्याने सुद्धा काजू बी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात काजू कलम देणे गरजेचे आहे. गेली दहा वर्षे काजू लागवड योजना बंद असल्याने लागवड कमी झाली आहे. तसेच काजू कलमांचे आयुष्य सरासरी २० वर्षेच असल्याने नवीन लागवड होणे गरजेचे
आहे. (प्रतिनिधी)


काजू कलमे पुरवावीत
४आफ्रिका खंडातील छोटे-छोटे देश लाखो टन काजू बी उत्पादित करून भारतात विक्री करत आहेत. कोकणात या महत्त्वाच्या पिकाची लागवड होण्यासाठी सामाजिक संघटना व सरकारने उदार धोरण ठेवून काजू कलमे पुरवावीत.
४ गेली आठ वर्षे शेतकऱ्यांना मी सुमारे
५ हजारांहून अधिक कलमे वाटली आहेत. बाजार समितीने याचा विचार करून निर्णय घ्यावा, असे खाडये यांनी म्हटले आहे.

Web Title: Injustice by the market committee for deciding cashew rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.