समुद्रातील अजैविक कचऱ्याचा समुद्री जिवांना मोठा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 05:03 PM2021-01-06T17:03:35+5:302021-01-06T17:05:24+5:30

Malvan beach Tourisam sindhudurg- पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेल्या मालवण किनारपट्टीवर अजैविक कचऱ्याची प्रचंड समस्या जाणवत आहे. गेल्या काही वर्षात मालवणच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात विघटन न होणारा कचरा सापडून येत आहे.

Inorganic waste from the sea is a big threat to marine life! | समुद्रातील अजैविक कचऱ्याचा समुद्री जिवांना मोठा धोका!

मालवण चिवला बीच येथील स्थानिक तरुणांनी समुद्र स्वच्छता मोहीम राबवित अजैविक कचऱ्याचे ढीग बाहेर काढले.

Next
ठळक मुद्देनौकांमध्ये अपघाताची शक्यता स्थानिक तरुणांनी कचऱ्याचे ढीग काढले समुद्राबाहेर

मालवण : पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेल्या मालवण किनारपट्टीवर अजैविक कचऱ्याची प्रचंड समस्या जाणवत आहे. गेल्या काही वर्षात मालवणच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात विघटन न होणारा कचरा सापडून येत आहे.

यात मोठ्या प्रमाणावर तुटलेली जाळी, प्लास्टिक बाटल्या, पिशव्या यांचा समावेश आहे. समुद्रातील या अजैविक प्रदूषणाचा फटका समुद्री जिवांना बसत आहे. मासेमारी किंवा पर्यटन नौकांच्या पंख्यामध्ये कचरा अडकण्याची दाट शक्यता असल्याने किनारपट्टीवर अपघाताचे धोकेही वाढले आहेत.

मालवण चिवला किनारपट्टीवर गेले काही दिवस समुद्रातील अजैविक कचरा सातत्याने किनाऱ्यावर वाहून येत होता. या पार्श्वभूमीवर मालवण चिवला बीच येथील तरुणांनी पुढाकार घेत समुद्रात स्वच्छता मोहीम राबविली.

यात मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करून किनाऱ्यावर आणण्यात आला आहे. या मोहिमेत स्वीटन रोज, जॉन्सन रोड्रिक्स, शुभम मुळेकर, राकेश वेंगुर्लेकर, पार्थ परब, गणपत मयेकर, फ्रान्सिस फर्नांडिस, जॉन्सन फर्नांडिस, मनोज मेतर आदी पर्यटन व्यावसायिक सहभागी झाले होते.

मालवण किनारपट्टीवरील सर्वात सुरक्षित बीच म्हणून चिवला बीच ओळखला जातो. याठिकाणी चालणाऱ्या जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे दाखल होतात. बोटिंग, पॅरासिलिंगदरम्यान नौकांच्या पंख्यामध्ये जाळी अडकण्याचा धोका लक्षात घेता, पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने खबरदारी म्हणून समुद्री स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याचे पर्यटन व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.

कचऱ्याचे साम्राज्य
मालवणच्या सागरी पर्यटन सफरीवर येणारे पर्यटक पाणी व खाद्यपदार्थ खाऊन रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक वेष्टणे किनाऱ्यावर तसेच समुद्राच्या पाण्यात टाकतात. त्यासोबतच तुटलेली जाळी समुद्रात तरंगत असतात. अशाप्रकारच्या सातत्याने येणाऱ्या अजैविक कचऱ्यातून समुद्रात मोठ्या प्रमाणात विघटनशील नसलेल्या कचऱ्याचे साम्राज्य तयार होते.

 

Web Title: Inorganic waste from the sea is a big threat to marine life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.