आयएनएस त्रिंकट युध्दनौका रत्नागिरीत
By admin | Published: December 10, 2014 10:38 PM2014-12-10T22:38:28+5:302014-12-10T23:51:28+5:30
उद्या आणि परवा (११ आणि १२ डिसेंबर रोजी) सकाळी दहा ते दुपारी साडेचार यावेळेत नागरिकांना पाहण्यासाठी
रत्नागिरी : भारतीय नौदलाची आयएनएस त्रिंकट ही युद्धनौका रत्नागिरीच्या भगवती बंदरात आली असून, ही युद्धनौका उद्या आणि परवा (११ आणि १२ डिसेंबर रोजी) सकाळी दहा ते दुपारी साडेचार यावेळेत नागरिकांना पाहण्यासाठी खुली असणार आहे.
भारतीय किनारपट्टी तसेच समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या संरक्षणाची मुख्य जबाबदारी असलेल्या या युद्धनौकेचे नाव मध्य निकोबारमधील त्रिंकट बेटसमुहांवरुन ठेवण्यात आले आहे. शत्रुचा वेगाने पाठलाग आणि विनाशकारी हल्ला करण्याची या नौकेची क्षमता आहे. आयएनएस त्रिंकट ही तिच्या श्रेणीतील पहिलीच नौका आहे.
नौकेवर वीजनिर्मिती तसेच समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी बनविण्याची यंत्रणा आहे. भारतीय नौदलातील एक महत्त्वाची युद्धनौका असलेल्या आयएनएस त्रिंकटला रत्नागिरी आणि परिसरातील नागरिकांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन रत्नागिरीच्या बंदर निरीक्षकांनी केले आहे. (प्रतिनिधी)