राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्गात १४४ मुलांची तपासणी

By admin | Published: May 6, 2017 04:58 PM2017-05-06T16:58:45+5:302017-05-06T17:02:21+5:30

पात्र हृदयरोगग्रस्त मुलांवर होणार शस्त्रक्रिया

Inspection of 144 children in Sindhudurg under National Child Health Program | राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्गात १४४ मुलांची तपासणी

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्गात १४४ मुलांची तपासणी

Next

 आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी, दि. 0४ : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या माध्यमातून 0 ते १८ वयोगटातील बालकांना आरोग्य विषयक तपासणी व संदर्भ सेवा देण्याकरीता जिल्ह्यातंर्गत १२ तपासणी पथकांद्वारे जिल्ह्यातील डॉ. भूषण चव्हाण, डॉ. पंकज शहा, (बालाजी हॉस्पीटल, मुंबई ) यांनी ११४ मुलांची तपासणी केली.

या मुलांपैकी शस्त्रक्रिया पात्र हृदयरोगग्रस्त मुलांना आरबीएसके मार्फत शस्त्रक्रिया करुन घेण्यात येईल अशी माहिती डॉ. एस. व्ही. कुलकर्णी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. जिल्ह्यातंर्गत १२ तपासणी पथकांद्वारे जिल्ह्यातील १ हजार ५७१ अंगणवाडी मधील ४७ हजार ७९१ मुलांची वषार्तून दोन वेळा आणि १ हजार ७५३ शाळांमधील १ लाख ३६ हजार ७१९ मुलांची तपासणी करण्यात आली.

या शिबीरामध्ये तपासणी दरम्यान किरकोळ आजार असणा-या मुलांना शाळा-अंगणवाडी मध्ये औषधोपचार केले जातात. तसेच विशेष उपचाराची गरज असणा-या विद्यार्थ्यांना ग्रामीण- उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे पाठविले जातात. तपासणी दरम्यान आढळलेले संशयित हृदयरोगग्रस्त मुलांसाठी २ डी ईको शिबीर जिल्हा रुग्णालयात दिनांक २९ एप्रिल २0१७ रोजी आयोजित केलेले होते.

या शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाय. आर. साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. ए. जे. नलावडे निवासी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (एनएचएम) एस. जी. सावंत, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक (आयबीएसके) स्नेहा, एस. सावंत-भोसले आणि आरबीएसके पथकातील अधिकारी, कर्मचारी व जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिबीराचे नियोजन जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक (आरबीएसके) स्नेहा एस. सावंत-भोसले, सांख्यिकी अन्वेषक व्ही. एस. राव आणि कार्यक्रम सहाय्यक एस. ए. पाटील यांनी केले. ईएमएस समन्वयक नुतन तळगावकर आणि आरबीएसके तालुकास्तरीय पथकाने या कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

Web Title: Inspection of 144 children in Sindhudurg under National Child Health Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.