कणकवलीतील उड्डाण पुलाची कोसळलेल्या बॉक्सेलची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 03:18 PM2020-07-23T15:18:23+5:302020-07-23T15:20:12+5:30
कणकवलीतील उड्डाण पुलाची बॉक्सेल संरक्षक भिंत कोसळली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार पिलरचे उड्डाण पूल व्हावे, याकरिता नगरपंचायत कन्सल्टंट व महामार्ग कन्सल्टंट यांनी संयुक्त पाहणी केली.
कणकवली : कणकवलीतील उड्डाण पुलाची बॉक्सेल संरक्षक भिंत कोसळली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार पिलरचे उड्डाण पूल व्हावे, याकरिता नगरपंचायत कन्सल्टंट व महामार्ग कन्सल्टंट यांनी संयुक्त पाहणी केली.
एकत्रित अहवालानंतर वाय बीम आकाराचे पूल करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी माजी आमदार प्रमोद जठार यांनी घेतली आहे.
कणकवलीतील बॉक्सेलच्या कोसळलेल्या भिंतीची व महामार्ग कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी दोन भिंतींच्या आतील कामाचीही पाहणी करण्यात आली.
यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, बंडू हर्णे, शिशिर परुळेकर, विराज भोसले आदींसह महामार्ग ठेकेदार कंपनी अधिकारी, कन्सल्टंट कंपनी अधिकारी व नगरपंचायत कन्सल्टंट उपस्थित होते.