युनेस्कोच्या टीमकडून सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 11:48 AM2024-10-08T11:48:32+5:302024-10-08T11:48:52+5:30
एमटीडीसीच्या आरमार बोटीने किल्ल्याची समुद्रातून पाहणी
मालवण : जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात नामांकन झाल्यानंतर युनेस्कोच्या टीमने काल, सोमवारी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देत पाहणी केली. यावेळी समितीने किल्ल्याची बांधणी व अन्य निकषांच्या दृष्टिकोनातून पाहणी कली.
यामध्ये युनेस्कोचे जापनीज प्रमुख अधिकारी हावजाँग ली, राज्य पुरातत्त्व विभागाचे संवर्धन अधिकारी शुभ मुजुमदार, जानवी शर्मा, शिखा जैन, राज्य पुरातन विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे, उपसंचालक हेमंत दळवी, केंद्र सर्वेक्षण पुरातत्त्व विभागाचे अन्य अधिकारी, राजेश दिवेकर, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे आदी उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्ग किल्ले रहिवाशी संघ, सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघ, सिंधुदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समिती आणि ग्रामपंचायत वायरी भूतनाथ यांच्या पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी सरपंच भगवान लुडबे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, श्रीराम सकपाळ, सयाजी सकपाळ, मंगेश सावंत, सचिन लोके, सादिक शेख, ज्योती तोरसकर, भाऊ सामंत, भूषण साटम, विकी तोरसकर, हितेश वायंगणकर, हेमंत वायंगणकर, उपसरपंच प्राची माणगावकर, ममता तळगावकर आदी उपस्थित होते.
एमटीडीसीच्या आरमार बोटीने किल्ल्याची समुद्रातून पाहणी
युनेस्कोच्या समितीने एमटीडीसीच्या आरमार बोटीने किल्ल्याची समुद्रातून पाहणी केली. किल्ल्याला समुद्रातून प्रदक्षिणा घालत समिती सदस्यांनी किल्ल्याची चौफेर पाहणी केली. तटबंदीवरून फिरून समितीने बुरुज आणि अंतर्गत भागाची पाहणी केली. पोर्तुगालकालीन नकाशे मिळावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.