कणकवलीत परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 07:53 PM2020-10-27T19:53:34+5:302020-10-27T19:55:43+5:30

Bjp, pravin darekar, Farmer, sindhudurgnews सरकारने शेती नुकसानीसाठी जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे. कोकणातील शेतकरी अवकाळी पावसाच्या संकटात पुरता उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे कोकणसाठी स्वतंत्र पॅकेजची सरकारने घोषणा करावी. तसेच ठाकरे सरकारने कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

Inspection of paddy fields damaged by return rains in Kankavali | कणकवलीत परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी भात पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी राजन तेली, प्रसाद लाड आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देकणकवलीत परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणीसरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा : प्रवीण दरेकर

कणकवली : सरकारने शेती नुकसानीसाठी जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे. कोकणातील शेतकरी अवकाळी पावसाच्या संकटात पुरता उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे कोकणसाठी स्वतंत्र पॅकेजची सरकारने घोषणा करावी. तसेच ठाकरे सरकारने कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या प्रवीण दरेकर यांनी ओसरगाव, वागदे आदी भागातील अवकाळी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीच्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन रविवारी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत पंचनामे झाले काय? याबाबत विचारपूस केली.

यावेळी आमदार नीतेश राणे, प्रसाद लाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा परिषद सदस्या सायली सावंत, कणकवली तहसीलदार रमेश पवार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

शासनावर कडाडून टीका करताना दरेकर म्हणाले, शासनाने निकष शिथिल करून, स्वतंत्र तरतूद करून कोकणाला शेती नुकसानीसाठी वेगळे पॅकेज द्यावे. या सरकारमध्ये योजनाचा अभाव आहे. निसर्ग चक्रीवादळातील ६० टक्के मदत अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे अत्यंत बारकाईने नियोजन करून मदत सरकारला जनतेपर्यंत पोहोचवावी लागेल. तीन पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये कोणाचाही कोणाला मेळ नाही, असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले .

यावेळी दरेकर यांनी वागदे, ओसरगाव येथील भातशेतीची पाहणी करीत तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकऱ्याला गुंठ्याला १०० रुपये मिळणार

यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले, आम्हांला वाटले होते की सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना भरीव मदत करेल. मात्र, सरकारने १० हजार रुपयांची जी मदत केलेली आहे, ती अत्यंत तुटपुंजी आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रात ५ एकरच्या वर शेती बागायती आहेत. तिथले शेतकरी बऱ्यापैकी सधन आहेत.

कोकणात जास्तीत जास्त ४० गुंठ्यांपर्यंत शेती आहे. १० हजार हेक्टरी पकडले तर येथील शेतकऱ्याला गुंठ्याला १०० रुपये मिळणार आहेत. याचाच अर्थ १० गुंठे शेती असेल त्याला १ हजार रुपये मिळणार आहेत. ही शेतकऱ्याची थट्टा आहे. कारण त्याला कापणीचा खर्चच तेवढा येणार आहे.

पाचशे, हजार रुपये देऊन थट्टा कसली करता?

१० हजार कोटींमधले ५ हजार ५०० कोटी फक्त शेतीसाठी आहेत. बाकी ३०० कोटी नगरविकासला आहेत. उर्जा विभागाला २३९ कोटी आहेत. रस्ते, पुलांसाठी २६०० कोटी रुपये आहेत. अशाप्रकारे हिशेब घातला तर गुंठ्याला फक्त ५ हजार ५०० कोटींतून ५५ रुपये येत आहेत. त्यामुळे तुम्ही असे पाचशे, हजार रुपये देऊन कशाला शेतकऱ्याची थट्टा करता? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.
 

Web Title: Inspection of paddy fields damaged by return rains in Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.