तपासणीबाबत सूचना दिल्या-वैभव नाईक यांनी दिली कडावल प्रा.आ.केंद्रात भेट,घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 11:33 AM2020-04-30T11:33:16+5:302020-04-30T11:34:38+5:30

त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घेण्याचे आवाहन आ.वैभव नाईक यांनी केले आहे.

Instructed about the investigation | तपासणीबाबत सूचना दिल्या-वैभव नाईक यांनी दिली कडावल प्रा.आ.केंद्रात भेट,घेतला आढावा

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, जि.प. गटनेते नागेंद्र परब, पं.स. उपसभापती जयभारत पालव, डॉ.मनीषा चुडे, डॉ.दिनकर सरोदे, कर्मचारी स्वप्नील बांदेकर, विजया सावंत, सुनील सावंत, गुरुनाथ मुंज, राजू मुंज, राजू सावंत, दिलीप सावंत, हे उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देशल्यचिकित्सक धनंजय चाकूरकर व जिल्हा आरोग्य यंत्रणेशी देखील फोनवर चर्चा

कुडाळ : आमदार वैभव नाईक यांनी कडावल प्राथमिक आरोग्य केंद्राला आज भेट देऊन सोनवडे मधील सापडलेल्या कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाबाबत आढावा घेतला. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तातडीने तपासणी करा तसेच त्या पंचक्रोशीतील प्रत्येक नागरिकांची तपासणी करा अशा सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.तसेच जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय चाकूरकर व जिल्हा आरोग्य यंत्रणेशी देखील फोनवर चर्चा करून नागरिकांच्या तपासणीबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घेण्याचे आवाहन आ.वैभव नाईक यांनी केले आहे.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, जि.प. गटनेते नागेंद्र परब, पं.स. उपसभापती जयभारत पालव, डॉ.मनीषा चुडे, डॉ.दिनकर सरोदे, कर्मचारी स्वप्नील बांदेकर, विजया सावंत, सुनील सावंत, गुरुनाथ मुंज, राजू मुंज, राजू सावंत, दिलीप सावंत, हे उपस्थित होते.

Web Title: Instructed about the investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.